वजन कमी करायचंय मेदोवृध्दी अर्थात लठ्ठपणा उपाय

447

१)सकाळी १कप कोमट पाण्यात ;१/२ लहान चमचा काथाची पुड टाकून सेवन करा

२)रात्री झोपतांना १चमचा तिळाचे तेल १डाळीच्या दाण्या ऐवढे सेंधव मीठ घालून प्यावे.

३)कुळीथाचे अर्धा ग्लास पाणी शिजवून प्यावे. अर्धा ग्लास पाण्यात 2 मोठे चमचे किळीथ 2 मिनिट उकळा व थोडे कोमट असतांना सकाळी प्या

४)जेवणानंतर ३चमचे सफरचंदाचा शिरका व्हेनिगर प्यावा. मेद झडतो.

५)आहारात कोबी,गाजर,मुळा यांचा वापर करा. फास्ट फूड,, मसालेदार पदार्थ, अति तिखट पदार्थ खाऊ नका , ब्रेड सारखे मैद्याचे पदार्थ खाऊ नका

६)सकाळी दीड लहान चमचा त्रिफळा चूर्ण पुरक म्हणून एक ग्लास कोमट दुधा सोबत व रात्री रेचक म्हणून 1 मोठा चमचा 1 ग्लास कोमट गरम पाण्यात झोपतांना घ्या.
फरक शंभरटक्के पडेलच.

७)तिळाचं तेल एक लहान चमचा व एक डाळी एवढं सैंधव सकाळ व सायंकाळ जेवणानंतर सेवन करा

८)दालचिनी पावडर 1 लहान चमचा 1 कप पाण्यात उकळवून पाणी 75% झाल्या नंतर तयार काढा दिवसातून एक वेळ प्या.

९) एक ग्लास गरम पाणी , अर्धा लहान चमचा लिंबू रस व 1 मोठा चमचा मध रोज दिवसातून एक वेळ घ्या.

१०)जिम न जाता दररोज 4 कीलो मीटर फिरण्यास जा, मेडिटेशन करा, सूर्यनमस्कार घाला. *

टिपः हे घरगुती उपचार असले तरीसुद्धा प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असल्यामुळे, प्रत्येकाने आधी आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करावी आणि नंतरच हे उपचार घरी करावेत.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here