नवी दिल्ली – काही वकील फी म्हणून तगडी रक्कम घेत असतात. प्रकरण जेवढे मोठे तेवढी जास्त फी वकिलांकडून घेण्यात येते. एका वकीलाने फी म्हणून क्लायंटकडून तब्बल 217 कोटी रूपये घेतल्याचे समोर आले आहे. ही घटना चंदीगडमध्ये घडली आहे. कर चुकवल्याच्या आरोपावरून आयकर विभागाने या चंदीगडमधील एका प्रसिद्ध वकिलावर छापा टाकला आहे. मीडिया अहवालानुसार, एका डिपार्टमेंटमधील एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली असून माहितीनुसार आयकर विभागाने या वकिलाशी संबंधीत असलेल्या तब्बल 38 ठिकाणांवर छापा टाकला आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली आहे. छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये हरियाणा, दिल्ली-एनसीआरमधील काही ठिकाणं आहेत. या कारवाईत 5.5 कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती सीबीडीटीने एका निवेदनात दिली आहे. तसेच वकिलाशी संबंधीत असलेले 10 लाॅकर देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. बोर्डाने वकीलाची ओळख पटवली नाही.
ताजी बातमी
महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...
नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे
महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही
मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...
नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल
“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...
चर्चेत असलेला विषय
आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान फायनलमध्ये, सूर्यकुमार यादवला बाहेर बसावं लागणार?
पाकिस्तानच्या संघाने गुरुवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा 11 धावांनी निसटता पराभव करत आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात...
कृषि यांत्रिकीकरण, सुक्ष्म सिंचन घटकांतर्गत महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 23 :- कृषि यांत्रिकीकरण तसेच सुक्ष्म सिंचन घटकांतर्गत विविध योजनेतून महाडीबीटी पोर्टलवर नांदेड जिल्ह्यात 9...
भारतात 5,880 नवीन कोविड प्रकरणे नोंदली गेली, सक्रिय संसर्ग 35,000-आकडा पार
भारतात सोमवारी कोविड-19 च्या दैनंदिन प्रकरणांमध्ये मागील दिवसाच्या तुलनेत किरकोळ वाढ होऊन 5,880 वर नोंद झाली. रविवारी...
कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथे रस्ता अपघातात 12 ठार, 1 जखमी
चिक्कबल्लापूर (कर्नाटक): येथे गुरुवारी सकाळी एका थांबलेल्या टँकरला एसयूव्हीने धडक दिल्याने १२ जण ठार तर एक गंभीर...



