लोणीतील सराफ दुकानावर दरोडा टाकणारे अट्टल गुन्हेगार मुद्देमालासह गजाआड : एकूण २१ किलो ७०० ग्रँम चांदी जप्त

दि. ८/१०/२०२० रोजी लोणी गावातील संतोष मधुकर कुलथे हे त्यांच्या वेताळबाबा रोड ते निर्मळ पिंप्रीरोडला असलेले कुलथे ज्वेलर्स नावाचे सराफी व्यवसायाचे दुकान बंद करुन्सानंकली ७.०० वाजण्याच्यासुमारास दुकानात असलेले सर्व सोन्याचांदीचे दागिने दोन पिशवीमध्ये भरून ते त्यांचेकडील शेवर्ले कार  मध्ये ठेवून घरी जाण्याच्या तयारीत असताना रोडकडून दोन पल्सर मोटारसायकल वरून ४ इसम आले व त्यांचेतील मागे बसलेल्या दोघांनी फिर्यादी यांचे दिशेने येऊन त्यांचेहातातील धारदार कोयते उगारले.त्याचवेळी दुस-या इसमाने कारची काच फोडून कार मध्ये ठेवलेला सोने चांदी चा ऐवाज जबरीने घेऊन,त्यांचेकडील मोटारसायकलवर बसून पिंपरी निर्मळच्या दिशेने निघून गेले .

सदर गुन्ह्याची नोंद शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये झाली असून सदर गुन्हाचा तपास दरम्यान सपोनि श्री मिथुन घुगे यांना गोपनीय माहिती मिळाली आहे.

सदर गुह्याची गोपनीय माहिती सपोनि श्री मिथुन घुगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय सताव साहेब यांना कळविली.त्यानुसार त्याच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सपोनि श्री मिथुन घुगे यांनी व त्यांचे सहकारी यांनी आरोपीचा कसोशीने शोघ घेतला असता शिरूर शहरात १)नवनाथ गोर्डे ,वय ३२ वर्ष रा सावळी विहीर त. राहाता २)अतुल अमले ,वय २४ वर्षे ,राहणार कर्वे नगर , जिल्हा पुणे ३) सागर मांजरे ,२३ वर्षे रा. मातापूर,त. श्रीरामपूर,हल्ली शिवाजीनगर ,अहमदनगर असर मिळून आले .

सदर आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याय एकून ५ आरोपी व २ विधीसंघार्षित बालक निश्:पन्न झाल्याने भादवि कलम ३९५,४१२,व आर्म अँकट ४/२५ हे वाढीव कलम लावण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here