लोक आत्महत्या का करतात ??? वेवेगवेगळे आर्थिक स्तर मानसिक ताणतणाव का कौटुंबिक कलह

    128

    “अरेरे त्याने जीव दिला पण समाज म्हणुन तूं काय केलं त्याच्या साठी लाज वाटली पहिजे आपलीच आपल्याला”

    आर्थिक ताणाचा आणखी एक बळी
    प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या भव्यता दिव्यता व ऐतिहासिक कलेच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टी व सांस्कृतिक क्षेत्रात देशभरातून नावाजलेले महाराष्ट्राचे सुपुत्र कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येचं वृत्त धक्कादायक आहे.
    दिल्लीमध्ये स्वतंत्रता दिनानिमित्त होणाऱ्या पथसंचलनामध्ये महाराष्ट्राची कला व संस्कृतीचे दर्शन मोठ्या दिमाखात जगासमोर मांडणारे म्हणून कायम त्यांचा अभिमान राहिल !

    कर्ज खूप झाल्याचे सांगितले जात होते ! आणि त्यांच्या कर्जत येथील स्टुडिओला तितके भाडे मिळत नव्हते जितके त्यांनी गुंतवले होते.
    विशेषतः लॉक डाऊन काळात फिल्म इंडस्ट्री पूर्णपणे सगळंच ठप्प झाल्याने कोसळली आणि त्यात जे कर्जापायी भरडले गेले त्यात हेही एक होते.
    जाणारा जातो पण मागे काहीतरी एक संदेश ठेवून जातो. असं मला वाटत. या घटनेतून संदेश एकच की….. परवाच मी जसे बोललो की पैसा महत्वाचा की समाधानी जगणे ? तर जगणे महत्वाचे आहे ! पैसे काय येतील जातील. गेले तर पुन्हा उभे करता येतील पण जगणेच हातून गेले तर काहीच करता येत नाही. मागे उरते भकास पोकळी आणि कुटुंबावर त्यांच्या कर्जाचा बोजा !

    मंडळी…. आर्थिक प्रगती जरूर करावी… पण इतकीही नाही की आत्महत्येची वेळ यावी. तसेची चांगलं जगायला फार काही लागत नाही. लॉकडाऊन पूर्वी जिथं आपल्याला महिना पन्नास हजार लागत होते तिथेच लॉक डाऊन काळात वीस हजारात भागत होतेच की ! आठवून पहा ! मग हा वाढीव तीस हजाराचा ताण का ओढवून घेतोय अन जीव द्यायची वेळ स्वतःवर का आणतोय ? हाच प्रश्न देसाईंच्या जाण्याने उभा केलाय.

    मंडळीनो….. कितीही ताण येऊ द्या. पण काही झालं तरी निराश होऊन जीव देऊ नका. हिंमत सोडू नका ! परिस्थिती कायम सारखी राहत नाही. उद्या ती बदलते सुद्धा ! मायनस एकशे वीस कोटी चे कर्ज झालेला अमिताभ डोळ्यासमोर ठेवा. त्याने इगो बाजूला ठेवून अगदी टूथपेस्ट च्या पण जाहिराती स्वीकारून कर्जातून बाहेर पडला. छोट्या पडद्यावर येऊन पुन्हा त्याने सगळी घडी बसवली ! त्याच्याकडून हे शिकूया !

    असो ! नितीन देसाई यांच्या कलेचे स्मरण कैक वर्ष आपल्या मनात राहीलच. त्यांचे स्मरण करूया आणि निर्धार करूया की आपण धीर सोडायचा नाही. हीच त्यांना श्रद्धांजली असेल !

    ताजा कलम

    शेवगांव शहरात अलीकडे अनेक आत्महत्या झाल्या त्याची कारणं त्या आत्महत्या करणाऱ्या लोकांसोबतच गेली पण उलट सुलट चर्चाना ऊत आलाय कोणी म्हणतंय आर्थिक ताणतणाव कोणी म्हणतंय अनैतिक संबंध जाणारे जातात जीवानिशी चर्चा करणारे म्हणतात वातड लागतंय एखाद्या कुटुंबाचा प्रमुख अनेक मित्र असलेला आपले मन कोंनाजवळचं मोकळं करू शकला नाही आपल्यामागे आपल्या कुटुंबची काय अवस्था होईल हा विचार एकदाही आला नाही लोकांनी आपला जीव एवढा स्वस्त करून ठेवलाय हिम्मत मारायला नाही जगायला लागते जगात टेन्शन कोणाला नाही??? आर्थिक ताणतणाव कोणाला नाही??? कुटुंबिक कलह कोणाला नाही ??? पण त्याचे उत्तर आत्महत्या निश्चित नाही आपलं मन मोकळ करा चिंता सोडा आत्महत्या करणे काय ज्दयांन गुन्हा आहे पण जी परिस्थिती त्याला हे कारायला भाग जो समाज जबाबदार असतो चार लोक काय म्हणतील हि भीती त्यास बळी पडते हे चार लोक केव्हा सुधारणार

    अत्यंत महत्वाचे

    ती वक्ती गेल्यावर गर्दी करणारे आणि चर्चा करणारे ती व्यक्ती मरणाच्या दारात उभी असताना कुठे गायब होती त्याच्या मनात काय उलथापालथ चाललीय हे कोणालाच कसे नाही कळले दिवस जातील लोक विसरतील पण ज्याचे कुटुंब प्रमुख गेले त्यांचं काय सर्वांनी आत्मपरीक्षण करायला हरकत नाही

    अविनाश देशमुख शेवगांव
    सामाजिक कार्यकर्ता पत्रकार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here