लोकसंख्यावाढीचे नियोजन आवश्यक:डॉ. मंगेश राऊत

493

लोकसंख्यावाढीचे नियोजन आवश्यक:डॉ. मंगेश राऊत


अहमदनगर: वाढत्या लोकसंख्येचे दृष्टीने कुटुंब नियोजन करणे तसेच दोन अपत्यांमध्ये योग्य अंतर ठेवणे लोकसंख्येचे दृष्टीने तसेच मातृआरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. असे प्रतिपादन डॉ. मंगेश राउत यांनी केले.


जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, अहमदनगर बार असोसिएशन, तसेच सेंट्रल बार असोसिएशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून आभासी पध्दतीने कायदेविषयक जागृती शिबीर आयोजित केले होते. त्यावेळी कुटुंब नियोजन व मातृत्व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. राऊत बोलत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे, अहमदनगर बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. भुषण ब-हाटे, सेंट्रल बार असोसिएशन अहमदनगरचे अध्यक्ष ॲड. सुभाष काकडे आदींची यावेळी उपस्थिती होती.


यावेळी डॉ. राऊत यांनी कुटुंबनियोजनाची आवश्यकता, त्यासाठी वापरल्या जाणार्‍या पद्धती, त्याचे फायदे आणि तोटे यावेळी समजावुन सांगितले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीस तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगरचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक जागृती शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जगामध्ये झपाटयाने होत असलेली लोकसंख्येची वाढ यावर आळा बसविणे तसेच नैर्सगिक संसाधनाचे संवर्धन व्हावे असा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
ॲड. ब-हाटे यांनी लिंग समानता या विषयावर मार्गदर्शन करताना सर्वच क्षेत्रामध्ये लिंग समानता राखली पाहिजे असे सांगितले. ॲड. काकडे यांनी जागतिक लोकसंख्या दिनाच्या संदर्भामध्ये गरीबी व मानवधिकार या विषयावर भाषण केले.

कार्यक्रमाचा लाभ अहमदनगर जिल्हयात कार्यरत असलेल्या महिला बचत गटातील महिलावर्ग, विधी स्वयंसेवक, पॅनल विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचार तसेच विधीज्ञांनी घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. आराधना चौधरी तर आभार प्रदर्शन भारती पाठक यांनी केले.

***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here