परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये सात फेरे घेतले. ताज लेक पॅलेसमध्ये सेहरा बांधल्यानंतर राघव एका बोटीतून लग्नाच्या पाहुण्यांसोबत लग्नस्थळी पोहोचला. या लग्नाला फक्त खास नातेवाईक आणि मित्रमंडळीच हजर होती. गेले कित्येक दिवस त्यांच्या लग्नाची तयारी सुरू होती. पंजाबी पद्धतीने हा विवाह पार पडला आहे. २४ सप्टेंबर रोजी ते विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांनी उदयपूर मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांचे लग्नातील फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यांनी अजूनही त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत. मात्र त्यांचा लग्नाच्या रिसेप्शनचा फोटो सध्या चाहत्यांमध्ये व्हायरल होतोय. या फोटोत ते दोघेही अतिशय सुंदर दिसत आहे. तिने गुलाबी साडी परिधान केली आहे. तिच्या या लूकचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.राघव चड्डा राज्यसभा सदस्य असून तो आम आदमी पार्टी तर्फे खासदार आहेगेले आठवडाभर त्यांच्या लग्नाची त्यांच्या लग्नाची धूम सुरू होती. त्यांनी उदयपूरमध्ये मोठ्या शाही पद्धतीने विवाह केला. त्यानंतर त्यांचा पहिला लूक समोर आला आहे. यात परिणितीने गुलाबी शिमर साडी नेसली आहे. गळ्यात हिऱ्यांचा मोठासा नेकलेस, हातात गुलाबी चुडा, आणि भांगेत कुंकू या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तर राघवही काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. त्यांचा हा फोटो सध्या चाहत्यांमध्ये व्हायरल झाला आहे. ते दोघेही अतिशय छान दिसत आहेत. सोशल मीडियावर सध्या त्यांच्याच लूकची चर्चा आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये सात फेरे घेतले.