औरंगाबाद 01 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद येथे प्रलंबित व वादपूर्व प्ररकणांचे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन न्यायाधीश मा. श्रीपाद टेकाळे यांच्या मार्गदर्शानाखाली करण्यात आले होते. लोकअदालतीमध्ये मोटार अपघात , विद्युत चोरी, धनादेशाचे अनादर झालेले, कौटुंबिक, भूसंपादन व तडजोड युक्त दिवाणी व फौजदारी अदि विविध प्रकारचे प्रकरणे ठेवण्यात आली होती.
लोक अदालतीमध्ये एकूण 1924 प्रलंबित व 543 दाखलपूर्व असे एकूण 2467 प्रकरणांमध्ये तडजोड होऊन प्रलंबित प्रकरणांमध्ये एकूण रक्कम रु.93,73,94,635/- व वादपूर्व प्रकरणांमध्ये एकूण रक्कम रुपये रु.3,46,99,077/- इतकी वसुली झाली अशी एकूण रक्क्म रुपये 97,20,93,172/- एवढ्या रकमेचा समावेश असलेली प्रकरणे लोक अदालतीमध्ये तडजोडीने मिटली.
लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी मा.श्री.श्रीपाद द.टेकाळे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे शासकीय अधिकारी, विद्युत कंपनीचे अधिकारी, वित्तीय संस्था, वकील व बॅकेचे अधिकारी यांच्यासमवेत बैठका घेण्यात आल्या होत्या. लोकअदातीच्या तयारीसाठी मा.श्री.श्रीपाद द.टेकाळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश औरंगाबाद यांच्या मार्गदर्शानाखाली श्री.ए.एस. कलोती, जिल्हा न्यायाधीश-1, श्री.एम.एस. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-11, श्रीमती एम.ए.मोटे, दिवाणी न्यायाधीश , व स्तर, श्री.पी.पी.मुळे, मुख्य न्यायदंडधिकारी व श्रीमती वैशाली प्र.फडणीस , न्यायाधीश जिल्हा विधि सेवा प्राधिकरण यांनी सर्व न्यायिक अधिकारी, विधीज्ञ, सरकारी वकील, वित्त्य संस्थाचे अधिकारी, विमा कंपनीचे अधिकारी, पोलीस अधिकारी,भूसंपादन संस्थेचे अधिकारी, मोबाईल कंपनीचे अधिकारी इत्यादी सोबत बैठका घेण्यात आल्या. सदर बैठकामध्ये सर्व प्रलंबित प्रकरणाचे संबंधित घटकांना लोकअदालतीमध्ये प्रकरण तडजोडीने निकाली काढण्योच आवाहन करण्यात आले होते.
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निश्चित केलेल्या नियमांची अंमलबजाणी करण्याकरीता यावेळेस जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , औरंगाबाद यांच्या वतीने प्रथमच ई-लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये एकूण 183 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. याप्रसंगी पॅनल प्रमुख म्हणून श्री.एस.एम.आगरकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2,श्री.पी.आर.शिंदे, सह.दिवाणी न्यायाधीश व स्तर श्री.डी.एस.वमने, 5वे सह.दिवाणी न्यायाधीश, क.स्तर यांनी काम पाहिले.