लिंक रोड परिसरातील गायके मळ्यात मृतदेह आढळलेल्या महिलेची अखेर ओळख पटली

लिंक रोड परिसरातील गायके मळ्यात मृतदेह आढळलेल्या महिलेची अखेर ओळख पटली

अहमदनगर -केडगाव उपनगरातील लिंक रोड परिसरात असलेल्या गायके मळ्यात एका शेतात वयोवृद्ध महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह गुरुवारी (दि.१७) दुपारी आढळून आला होता, या महिलेची ओळख पटली असून ती पाथर्डी तालुक्यातील जोडमोहोज येथील रहिवासी होती व गेल्या काही महिन्यांपासून अरणगाव जवळील हनुमाननगर येथे नातेवाईकांकडे वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. शांताबाई रावसाहेब वांढेकर (वय ६५) असे तिचे नाव आहे.गायकेमळा परिसरातील एका शेतात गुरुवारी (दि.१७) दुपारी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता.याबाबतची माहिती मिळताच शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तेथे बारकाईने पाहणी केली असता काही चिठ्या सापडल्या. त्यात अनेक मोबाईल नंबर होते. त्यातील एक नंबर हा तिच्या कुटुंबियांचा होता. पोलिसांनी त्यावर संपर्क साधत माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक व कुटुंबीय तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी मृतदेह हा वांढेकर यांचा असल्याचे ओळखले. त्यानंतर पोलिसांनी सर्वांचे जबाब घेवून तसेच मृतदेहाचे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तो अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. सदर महिला ही हनुमान नगर येथे गेल्या काही महिन्यापासून नातेवाईकांकडे वास्तव्यास होती, १५ – २० दिवसांपूर्वी ती अचानक गायब झाली होती. ती आजारी होती तसेच तिला चक्कर येत असे असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले असल्याची माहिती उपनिरीक्षक मनोज कचरे यांनी सांगितले. तिचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा शोध पोलिस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here