लालफितशाही: सेवानिवृत्तीची रक्कम न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

    लालफितशाही: सेवानिवृत्तीची रक्कम न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

    हिंगोली : जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी उत्तम काळे (५९) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सेवानिवृत्तीची रक्कम न मिळाल्याने कर्जाची परतफेड करता येत नसल्याने काळे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या बळसोंड भागातील माऊली नगरात वास्तव्यास असलेले उत्तम काळे (५९) हे गुरुवारी घरातून फिरायला म्हणून गेले ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध सुरू केला पण ते उशिरा पर्यंत सापडले नाही.दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह गळफास घेऊन लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. उत्तम काळे यांनी मोतीलाल ओसवाल फायनान्सकडून घर बांधणीसाठी ६ लाख ९५ हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. ते सेवानिवृत्त झाल्याने त्यांना सेवानिवृत्तीची रक्कम मिळणार होती. पण सदर रक्कम मिळण्यास उशीर होत असल्याने ते कर्जाचा हप्ता वेळेवर भरू शकत नव्हते. त्यामुळे काळे मानसिक तणावाखाली वावरत होते.कर्जाची परतफेड करतात येत नसल्याने तणावात येत त्यांनी आत्महत्या केली. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दुर्गेश्वर उत्तम काळे यांच्या तक्रारीवरून नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सेवानिवृत्तीची रक्कम वेळेवर मिळाली असती तर काळे यांचे प्राण वाचले असते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here