
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझीलाडकी बहीण ही राज्य शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना. याची सुरुवात 2024 मध्ये झाली आहे आणि नुकताच या योजनेला एका वर्षाचा काळही पूर्ण झालाय. आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 13 हप्ते मिळाले आहेत.44या योजनेतून प्रत्येक महिन्याला पात्र लाभार्थ्यांना पंधराशे रुपये दिले जात आहेत.
या योजनेचा जुलै महिन्याचा लाभ नुकत्याच काही दिवसांपूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळाले आहेत.
जुलै चा हप्ता ऑगस्टमध्ये मिळाला असल्याने ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार हा मोठा सवाल आहे. पण आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांनी राज्य शासनाकडून पुढील हप्त्याची घोषणा होणार आहे.
पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता काही महिलांना दिला जाणार नसल्याचेही वृत्त हाती आले आहे. अशा स्थितीत आता आपण या योजनेचा पुढील हप्ता राज्यातील कोणत्या महिलांना दिला जाणार नाही याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
कोणाला मिळणार नाही लाभ ?
ही योजना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या गडबडीत सुरु झाली. या योजनेचा राज्यातील अडीच कोटी महिलांना लाभ दिला जातोय. सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेच्या निकषांची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही.
पण आता या योजनेची पडताळणी सुरु करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांच्या घरी जाऊन या योजनेचे पडताळणी करत आहेत. लाडकी बहीण योजनेतून तब्बल 42 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले.
दरम्यान पडताळणी नंतर यातील 26 लाख महिला या योजनेतून अपात्र झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे अजूनही पडताळणीचे काम सुरु आहे म्हणून आगामी काळात अपात्र महिलांची संख्या आणखी वाढणार आहे. अजूनही अनेक महिला या योजनेतून अपात्र होणार आहेत.
स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी 26 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्यात अशी माहिती दिली आहे. 21 वर्षांपेक्षा कमी आणि 65 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांना या योजनेतून अपात्र केले जात आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला देखील या योजनेतून अपात्र होत आहेत.
सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांना या योजनेतून अपात्र केले जात आहे. ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन असणाऱ्या महिलांना सुद्धा या योजनेतून बाद केले जात आहे. ज्या कुटुंबात आयकर भरणारे लोक आहेत अशा कुटुंबातील महिलांना सुद्धा या योजनेतून बाहेर काढले जात आहे.