
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी १ दिवसाची मुदत उरली आहे. आता सर्व लाडक्या बहिणींना केवायसी करणे अनिवार्य आहेत. यासाठी उद्या म्हणजेच १८ नोव्हेंबर रोजी मुदत संपणार आहे. दरम्यान, अजूनही राज्यातील लाखो कोट्यवधी महिलांची केवायसी बाकी आहे. त्यामुळे आता सरकार केवायसीसाठी मुदतवाढ देणार का असा प्रश्न विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेत १ कोटी १० लाख महिलांची केवायसी होणे बाकी आहे. केवायसीसाठी शेवट शेवटचा १ दिवस उरला आहे. त्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या काळात सरकारला महिलांची नाराजी परवडणारी नाही. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत ई केवायसीसठी मुदतवाढ मिळेल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
५० लाख महिलांचे अर्ज बाद.
लाडकी बहीण योजना सुरु होऊन वर्ष उलटून गेले आहे. या योजनेत जवळपास २ कोटी ९ लाख महिलांनी अर्ज केले होते. दरम्यान, त्यानंतर महिलांची पडताळणी करण्यात आली. ज्या महिला योजनेच्या निकषांमध्ये बसत नाही त्यांचे लाभ बंद करण्यात आले आहे. सुमारे ५० लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. यामध्ये चारचाकी वाहने, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला, सरकारी कर्मचारी, दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असणारे लाभार्थी अशा सर्व लाभार्थ्यांचे अर्ज बाद केले आहेत.
लाडकी बहीण योजनेत आता अजून काही महिलांचे लाभ बंद होणार आहेत. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचे लाभ बंद होणार आहे. याचसोबत आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. याचसोबत ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही, अशा महिलांच्या केवायसीसाठी वेबसाइटमध्ये बदल केला जाणार आहे.





