लाच घेताना वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकास रंगेहाथ अटक..

436
  • औरंगाबादमधील वाळुज परिसरातील वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५ हजारांची लाच घेताना काल दि.४ रोजी रंगेहाथ अटक केली असून जनार्दन सुभाष साळुंखे (वय.४२) असे लाच घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
  • फिर्यादी यांच्या वाळुचा ट्रक त्यांच्या हद्दीतुन जाऊ देण्यासाठी आरोपी जनार्दन साळुंखे याने ५ हजार रूपये प्रतिमहीना लाचेची मागणी केली होती. त्यावरून फिर्यादीने सदरील आरोपीची तक्रार लाचलुचपत पतिबंधक विभागात केली. त्यावरून सापळा लावत ५ हजारांची लाच स्विकारताना आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
  • सदरील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपुत, हेडकॉंस्टेबल राजेंद्र जोशी, भूषण देसाई, केवलसिंग गुसिंगे, मिलिंद इप्पर, चांगदेव बागुल यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here