अहमदनगर- शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या अंधारे या पोलिसाला अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 5000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले.
आरोपी = प्रविण दिलीप अंधारे, वय 33 वर्ष, नेमणूक – शिर्डी पोलिस स्टेशन. रा- गणेश निकम यांचे घरी भाड्याने , नांदुरख़ी रोड, गणेश वाडी, शिर्डी, ता. राहता. मुळ राहणार बोधेगाव ता. शेवगाव जि.अहमदनगर , वर्ग 3
लाचेची मागणी- 5000/-₹
लाच स्विकारली ** -5000/₹
हस्तगत रक्कम- 5000/-रु
लाचेची मागणी – ता.09/10/2020
लाच स्विकारली -ता. 09/10/2020
लाचेचे कारण -.यातील आरोपी लोकसेवक यांचे कडे तक्रारदार यांचे भावाचे मृत्यू संदर्भात दाखल असलेल्या अ.मृ चे तपासामध्ये आरोपी लोकसेवक यांनी केलेल्या खर्चापोटी तक्रारदार यांचे कडे लाचेची मागणी केली होती.तक्रारदार यांनी ला.प्र.वि अहमदनगर यांचे कडे दिलेल्या तक्रारीवरून आज दिनांक 09/10/2020 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी लोकसेवक यांनी पंचा समक्ष रु 5000/- लाचेची मागणी केली व त्यानुसार आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान रु 5000/- लाचेची रक्कम पंचासमक्ष शिर्डी पोलिस स्टेशन आवारात स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
सापळा अधिकारी =
हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर
▶️ सहा. सापळा अधिकारी*
दीपक करांडे, पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि अहमदनगर
▶ मार्गदर्शक –मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
▶ आरोपीचे सक्षम अधिकारी – मा पोलीस अधीक्षक, अहमदनगर






