लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबईचा प्लान तयार

443

Mumbai Child Vaccination Plan :   पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोस (Booster Dose) संबंधी महत्त्वाची घोषणा केली. यावेळी त्यांनी 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासह (Vaccination) बूस्टर डोस संबंधीदेखील माहिती दिली. हे लसीकरण सुरु झाल्यानंतर सर्वाधिक लक्ष असणार आहे मुंबई महानगराकडे. कारण मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात मुलांची संख्या आहे. मात्र लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबईचा प्लान तयार आहे. मुंबईत 30 लाख लहान मुलांचं लसीकरण होणार असल्याची माहिती आहे.  

केंद्र शासनाकडून सविस्तर गाईडलाईन येताच येत्या 2-3 दिवसांत लहान मुलांचे लसीकरण सुरु करणार आहे. प्रसुतीगृह आणि लहान मुलांची रुग्णालये, महापालिकेची 350 लसीकरण केंद्रे याठिकाणी लहान मुलांचे लसीकरण होईल. लस देण्यासाठीची सिरीज, निडल कदाचित वेगळी असेल, निडलची साईज काय असेल याबाबत स्पष्टता नाही. याबाबत केंद्र सरकारकडून सविस्तर गाईडलाईन येणं गरजेचं आहे.

मुंबई पुरेसा लससाठा करण्यासाठी शीतगृह आहेतच. मात्र, लहान मुलांसाठीच्या लसीकरता वेगळ्या तापमानाची आवश्यकता असेल का याबाबतही गाईडलाईन्स आल्यानंतर स्पष्टता येईल. 

या लसीकरणानंतर 1500 व्यक्तींच्या स्टाफला लहान मुलांच्या लसीकरणासाठी ट्रेनिंग देण्यात येईल. खाजगी रुग्णालयांतील डॉक्टर्सनाही ट्रेनिंग देणार असल्याची माहिती आहे. 

लहान मुलांच्या लसीकरणानंतर काही रिअॅक्शन्स आल्या तर यापूर्वीच उभारलेल्या पेडिएट्रीक वॉर्ड उभारण्यात आलेत त्याचा वापर करता येऊ शकेल. लहान मुलांच्या लसीकरणाकरताही महापालिका जनजागृती मोहिम हातात घेईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here