लष्करातील महिला अधिकाऱ्याच्या आत्महत्येत वेगळाच अँगल , पतीकडून गंभीर आरोप

पुण्यातून ब्रेकिंग..लष्करातील महिला अधिकाऱ्याच्या आत्महत्येत वेगळाच अँगल , पतीकडून ,गंभीर आरोप

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना पुणे येथे एका लष्करी महिला अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आला होता. वानवडी येथील या घटनेने पुण्यात चांगलीच खळबळ उडाली होती, त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आणि आणि या महिलेच्या मृत्यू मागील धक्कादायक सत्य समोर आले आहे.पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लेफ्टनंट कर्नल महिलेशी तिच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी असलेल्या एका आरोपीने अनैतिक संबंध ठेवले आणि त्यानंतर त्याचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची आरोपी सातत्याने या महिलेला धमकी देत होता. त्यामुळे महिलेने आत्महत्या केली, असे या महिलेच्या पतीचे म्हणणे आहे. महिलेचे वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडियर अजित मिलू ( सध्या राहणार ब्रिगेडियर जनरल स्टार हेडक्वॉर्टर, आर्मी ट्रेनिंग कमांड , शिमला हिमाचल प्रदेश ) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडी येथील ऑफिसर मेसमध्ये 13 ऑक्टोबर रोजी ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती. सदर प्रकार हा 2019 पासून ते 12 ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुरू होता. मयत महिलेचे पती हे जयपूर येथे लष्करी सेवेत असून या घटनेनंतर ते पुण्यात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत अधिकारी ह्या काही वर्षांपासून प्रशिक्षणासाठी सिमला इथून पुण्यात आल्या होत्या. त्यानंतर सातत्याने ब्रिगेडियर मिलू हे तिला धमक्या देत होते त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली.लेफ्टनंट कर्नल असलेली ही महिला सिमला येथे कार्यरत होती, याच काळात तिचे मिलू याच्यासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. ब्रिगेडियर मिलू यांनी याचा गैरफायदा घेत महिलेला लग्नाचे वचन दिले आणि तिच्या सोबत अनैतिक संबंध ठेवले. दरम्यानच्या काळात त्याने फोटो आणि व्हिडिओ देखील बनवले आणि त्याच्या आधारे तिला ब्लॅकमेल करणे सुरू झाले, अखेरीस वैतागून महिला अधिकाऱ्याने पुण्यात आत्महत्या केली होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here