लग्नबंधनात अडकले कतरिना कैफ- विकी कौशल, २८ मिनिटांत पूर्ण केले सप्तपदीसंपूर्ण विवाह स्थळाला केलेली आकर्षक अशी रोषणाई,

लग्नबंधनात अडकले कतरिना कैफ- विकी कौशल, २८ मिनिटांत पूर्ण केले सप्तपदी

संपूर्ण विवाह स्थळाला केलेली आकर्षक अशी रोषणाई, ढोलांचा गजर आणि मंगलमय अशा शंखनादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातल्या. या दोघांनी एकमेकांना वरमाळा घातल्यानंतर या दोघांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला गेला.

तसेच विवाहस्थळी उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींनी नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षावर केला. राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा या आलिशान हॉटेलमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या दांपत्याने २८ मिनिटांमध्ये अग्नीदेवतेसमोर सप्तपदी चालत एकमेकांना आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून निवडले.

लग्नावेळी विकीने गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर कतरिनाने देखील गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.लग्न लागण्यापूर्वी विवाहस्थळी विकी कौशलने त्याच्या वऱ्हाडी मंडळींसोबत खास पंजाबी स्वॅग दाखवत एण्ट्री घेतली होती.

विकीची वरात विंटेज गाडीमधून काढण्यात आली होती. लग्न सोहळ्याच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.सर्वांनी परिधान केल्या एकसारखे फेटेया शाही विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींनी एकसारखे फेटे घातले होते. यामध्ये सनी कौशल, कबीर खान, अंगद बेदी, करण जोहर अशा मान्यवर मंडळींचा समावेश आहे. या विवाह सोहळ्यात अभिनेत्री सारा अली खान आणि आलिया भट्टदेखील सहभागी झाल्या.

या दोघी गुरुवारी सकाळी मुंबईहून राजस्थानला रवाना झाल्या. यावेळी दोघींनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती.

कतरिनाने उचलला लग्नाचा ७५ टक्के खर्च, एकटीने घेतले निर्णय

लग्नबंधनात अडकले कतरिना कैफ- विकी कौशल, २८ मिनिटांत पूर्ण केले सप्तपदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here