रोहीत पवारांनी उभारल 600 बेडच राज्यातल पहिल जंबो कोविड सेंटर

761

तरूण,तडफदार आमदार रोहीत पवार नेहमीच त्यांच्या लोकपयुक्त कल्पनांमुळ चर्चेत असतात.समस्त तरुणाईला मार्गदर्शन,प्रेरणा देणार्या रोहीत पवारांनी कर्जत जामखेडमध्ये 600 बेडच जंबो कोविड सेंटर उभारण्याच्या कल्पनेला मूर्त स्वरूप आणण्याच ठरवल,त्यासाठी त्यांनी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांचा सातत्यान पाठपुरावा केला आणि 600 बेडच हे जंबो कोविड सेंटर कर्जत जामखेडमध्ये अस्तित्वात आल.

आमदारकीची भूमिका निभावताना आपल्या मतदार संघात आपल्याकडून जास्तीत जास्त काम व्हावीत तसेच जनतेच्या प्रत्येक समस्येची सोडवणूक व्हावी अस त्यांच धोरण असत.कोरोनाची आलेली साथ आणि त्या अनुषंगान रुग्णांना लागणारी स्वतंत्र आरोग्य व्यवस्था यादृष्टीन हे कोविड सेंटर उपयुक्त ठरत आहे.

रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त कै.डॉ रजनीकांत आरोळे आणि मेबल आरोळे या दाम्पत्यानी उभारलेल्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पाअंतर्गंत डॉ शोभा आरोळे आणि रवी आरोळे हे दोघे गेले वर्षभरापासून हे कोविड सेंटर बघत आहेत.अशा प्रकारच कोविड सेंटर हे राज्यातल पहिल कोविड सेंटर ठरल आहे.

जंबो कोविड सेंटरसाठी रोहीत पवारांनी आवाहन केल आणि समाजातील अनेक दानशुरांनी यासाठी मदत केली.त्यांचेही रोहीत पवारांनी आभार मानले.यापुढे जाऊन रोहीत पवारांनी येथेच आणखी दोनशे बेडच हॉस्पीटल उभारण्याच ठरवल असून एकूण 820 बेडच हॉस्पीटल नागरिकांच्या सेवेत रूजू होणार आहे.यात 320 आॅक्सीजन बेड असणार आहेत.

कोरोनाचा फैलाव पाहता हे कोविड सेंटर रूग्णांना वरदान ठरणार आहे. आमदार रोहीत पवार कर्जत जामखेडमध्ये ‘आपल माणूस हक्काच माणूस’या नावाला सार्थ कामगियरी बजावत असून शरद पवारांच्या वारशाला साजेस काम करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here