रोहितने 11 चेंडूत 5 विकेट घेणारा गोलंदाज मैदानात उतरवला, डेब्यू सामन्यात 2 बळी घेत विश्वास सार्थ ठरवला

453

रांची : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज T-20 मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेतील पहिला सामना जयपूरमध्ये खेळवला गेला होता, जो टीम इंडियाने पाच विकेट्सने जिंकला होता. आता ते मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहेत. आजचा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न टीम इंडिया करणार आहे. दरम्यान, या महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा एका मॅचविनर खेळाडूसह मैदानात उतरला आहे. या खेळाडूचं नाव आहे हर्षल पटेल. (IND vs NZ T20 : Harshal Patel Picks Two Big Wickets on Debut)

रांचीचं ‘रण’ जिंकण्यासाठी न्यूझीलंडने टीममध्ये बदल केले आहेत. तसेच भारताकडून हर्षल पटेलचं पदार्पण होत आहे. मोहम्मद सिराजच्या दुखापतीमुळे त्याच्या जागी आज हर्षल पटेलला संधी देण्यात आली आहे. हर्षल पटेलने आयपीएलमधील एका सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळताना 11 चेंडूत 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. हर्षल पटेल हा आयपीएलमध्ये विराट कोहलीचं प्रमुख शस्त्र आहे.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील आयपीएल 2021 च्या पहिल्याच सामन्यात वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने अप्रतिम गोलंदाजी करताना पाच विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात हर्षल पटेलने 27 धावांत पाच बळी घेतले. ही त्याची टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तसेच, त्याने टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाच विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध पाच विकेट घेणारा हर्षल पटेल हा पहिला गोलंदाज आहे. तसेच आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच आरसीबीच्या गोलंदाजाने आयपीएलमध्ये पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

रांची T20 साठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये, मागील सामन्यात डाव्या हाताला दुखापत झालेल्या मोहम्मद सिराजच्या जागी हर्षल पटेलला संधी मिळाली आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक सिराजच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, हर्षल पटेलने रांची T20 मधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.

IPL 2021 मध्ये, हर्षल पटेलने विराट कोहलीच्या टीमकडून खेळताना लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या. आणि पर्पल कॅप जिंकली. जेव्हा जेव्हा विराट कोहलीला सामन्यात विकेटची आवश्यकता असायची तेव्हा हर्षल पटेल त्याचे ट्रम्प कार्ड असायचे. हर्षलने आयपीएलच्या मोसमात 32 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.

आजच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी रोहितचा हा निर्णय सुरुवातीला चुकीचा ठरवला होता. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पॉवरप्लेमध्ये तब्बल 64 धावा कुटल्या. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चांगलंच पुनरागमन केलं. एकवेळ अशी होती की, न्यूझीलंड या डावात अगदी सहज 180-200 चा आकडा सहज पार करेल असे वाटत होते, मात्र मधल्या षटकात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवलं. तसेच ठराविक अंतराने विकेट्सदेखील घेतल्या. परिणामी न्यूझीलंडचा डाव 6 बाद 153 धावांमध्ये रोखण्यात भारताला यश आलं. भारताकडून या डावात हर्षल पटेलने सर्वाधिक 2 बळी घेतले. तर अक्सर पटेल, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार आणि रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक बळी घेतला. या मालिकेतील पहिला सामना जयपूरमध्ये खेळवला गेला होता, जो टीम इंडियाने पाच विकेट्सने जिंकला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here