
[21/08, 9:25 pm] Avinash Deshmukh: रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये नागपंचमीनिमित्त सर्पमित्र संतोष लाकडे यांचे व्याख्यान सापांना मारण्याऐवजी सर्पमिञांना कळवा :सर्पमिञ संतोष लाकडे
{ अविनाश देशमुख शेवगांव }
9960051755
शेवगाव |प्रतीनिधी निसर्गातील महत्त्वाचा घटक आणि परिसंस्थेतील एक महत्त्वाचा दुवा म्हणून सापांची ओळख आहे. हे मूल्य जाणूनच भारतीय संस्कृतीने सापांना पूजनीय बनविले आहे. परिणामी नागपंचमीच्या दिनानिमित्ताने का होईना सापांकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जाते. हा दिन साजरा करण्यामागचा उदात्त हेतू बाजूला सारून नाग किंवा सापाला दूध पाजणे, त्यावर हळद-कुंकू टाकून त्याची पूजा करणे यासारख्या अंधश्रद्धायुक्त प्रथा पाळल्या जात आहेत. साप दूध पित नाही किंवा त्यावर हळद-कुंकू टाकू नये, याचा प्रचार आणि प्रसार दरवर्षी केला जात असला तरी रुढींच्या ताब्यात असलेल्या या बाबी कमी होताना दिसत नाहीत असे मत जे.बी.एस.एस पर्यावरण विभाग संस्थेचे प्रदेशाध्यक्ष मा. संतोष लाकडे यांनी व्यक्त केले.ते रेसिडेन्शिअल हायस्कूल व राष्ट्रीय हरित सेना आयोजित व्याख्यानामध्ये बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी वेगवेगळ्या सापांची माहिती दिली. सर्प हे पर्यावरणामध्ये आवश्यक आहे नागपंचमीला नाग देवतेची पूजा केली जाते. एखादेवेळी आपल्या घरामध्ये एखादा साप निघाला तर सर्प मित्राला फोन करून तो पकडण्यास सांगावे . असे आव्हान केले.याप्रसंगी सर्पमित्र संतोष लाकडे व विशाल गोरे यांचा विद्यालयाचे वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य बालाजी गायकवाड, उपप्राचार्य लक्ष्मण सोळसे ,पर्यवेक्षिका छाया शिंगटे तसेच हरित सेना विभाग प्रमुख नितीन भुसारी आदी उपस्थित होते. त्याबरोबर विद्यालयातील सर्व विद्यार्थी , सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .या व्याख्यानाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गव्हाळ यांनी केले तर आभार रामनाथ काळे यांनी मानले.
अविनाश देशमूख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार
[21/08, 9:53 pm] Avinash Deshmukh: ईडलवाईज ब्रोकर इंडिया लिमिटेड कंपनी मध्ये गुंतवणूक करून दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून 13 कोटी 49 लाख रुपयांची फसवणूक
{ अविनाश देशमुख शेवगांव }
ईडलवाईज ब्रोकर इंडिया लिमिटेड कंपनी मध्ये गुंतवणूक करून दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून 13 कोटी 49 लाख रुपयांची फसवणूक
केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी तिघा जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर मधील अनेक जणांची अशाप्रकारे फसवणूक केली गेल्याची शक्यताही असून. हा आकडा मोठा असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बाळासाहेब निवृत्ती काळे, भारती बाळासाहेब काळे, निहाल बाळासाहेब काळे, ( सर्व राहणार स्वामी बंगला रूपमाता नगर सावेडी सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत प्रियंका शैलेंद्र सूरपुरिया( देना बँक कॉलनी, हॉटेल प्रेमदान जवळ, सावेडी रोड) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी याने ईडलवाईज ब्रोकर लिमिटेड कंपनी मध्ये गुंतवणूक करून दरमहा दर महिन्याला पाच टक्के परतावा देतो ,असे सांगून फिर्यादी व त्यांचे पती तसेच इतर सहकाऱ्यांकडून सन 2019 ते ऑक्टोबर 2022, या कालावधी वेळोवेळी 13 कोटी 49 लाख रुपये बँक च्या खात्यावर घेतले.

ताजा कलम
आरोपी हे मूळचे शेवगांव तालुक्यातील रावतळे कुडगाव येथील असुन शेवगांव तालुक्यातील आणि शहरातील अनेक गडगंज असलेल्या लोकाना गंडा घातल्याची चर्चा आहे परंतु सगळा दोन नंबरचा पैसे असल्याने चोरीचा मामला हळुहळु बोंबला असा झालं आहे काहींची अवस्था सांगता येईना आणि सहनही होईना
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता पत्रकार
[22/08, 8:09 am] Avinash Deshmukh: पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही…
{ अविनाश देशमुख शेवगांव }
9960051755
टप्पा १:- १९५० ते १९७५
या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती.
सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३० एकर जमिनीचे मालक…
मोठे वाडे…
दांडगा रुबाब…
निसर्गावर चालणारी शेती…
अगदी १० वी-१२ वी शिकलेले सुद्धा शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले. तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळावायचे.
अनेक पदवीधर PSI, Dy. SP, तहसीलदार त्या काळात झाले.
नाही जरी नोकरी लागली तर आहे की 20-30 एकर शेती…
उत्तम शेती, दुय्य्म नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती.
हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता.

टप्पा २:- १९७५ ते १९९५
देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला, १९७४ च्या दुष्काळापासून निसर्गाने झटका द्यायला सुरुवात केली.
शेतीची विभागणी सुरु झाली, २० एकराचे मालक ५ एकरावर आले.
बाहेरील राज्यातील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरु झाले.
शेती आता भांडवलदाराची होऊ लागली.
विहिरी, मोटारी, पाईप लाईन आल्या.
पाणी उपसण्याची स्पर्धा सुरु झाली.
राजकारण गावागावात घुसलं.
पुढारपणाच्या नादात अनेकांनी जमीनी कवडी मोलाने विकल्या.
बाई-बाटलीत अनेकजण बरबाद झाले.
स्पर्धा वाढली.
आता नोकरी सोपी राहिली नाही.
हायस्कुलवर नोकरीचा दर २० लाख झाला.
वाढणाऱ्या गरजेपोटी जमिनी विकायला सुरवात झाली.
२० एकराचा मालक मोकळा झाला व गावच्या कट्ट्यावर विड्या फुकू लागला, पोरं बेकार फिरू लागली.
टप्पा ३:- १९९५ -२००९
हा काळ मराठी माणसाच्या जबरदस्त घसरगुंडीचा काळ.
परराज्यातून मोठया प्रमाणात लोक आले.
मोठे उद्योग यांनी काबीज केले.
हॉटेल शेट्टी लोक, दूध, पेपर, भाजीपाला, टॅक्सी, पाणीपुरी, किरकोळ दुकानदारी आदि उत्तरेतील लोकांनी काबीज केली.
सहकारी कारखाने, बँका, पेट्रोल पम्प, बिअर बार, दारू दुकानें चाणाक्ष पुढाऱ्यांची झाली.
मराठी माणूस मात्र अजूनही विहीर पाडणे, बोअर मारणे, स्पर्धा परीक्षा तयारी करणे, भरतीला जाणे, पोराला हायस्कुल वर चिटकवणे ह्यातच गुंतलेला दिसला.
२० एकर जमीन वाटण्या होऊन, मग विकून एकरावर आली तरी डोळे उघडतं नव्हते.
अजूनही पाटीलकी व जमीनदारीच्या दिवा स्वप्नात रमला होता.
टप्पा ४:- २००९ ते २०२०
ग्लोबलायझेशन झाले, जगाचे पैसे भारतात आले.
पुणे, मुंबई, इतर शहराजवळील जमिनींना किंमती आल्या.
मग काय?
जमिनी विकायची स्पर्धाच सुरु झाली.
राजकीय कार्यकर्ते एजंट झाले व मराठी माणसाचा ‘मुळशी पॅटर्न’ झाला.
जमीनदारी संपली, पोरं बेकार किंवा पुणे-मुंबईत ८-१० हजारांच्या नोकऱ्या करू लागली.
आता विकायलाही काही शिल्लक राहिलं नाही.
खरी, बिकट गरिबी सुरु झाली.
पोरांचा वापर शंभर-दोनशे देऊन राजकारणात सुरु झाला.
बापाकडे लग्नाला पैसा नाही.
मग पोरी हात धरून पळून जाऊ लागल्या.
गावचा जमीनदार हमाली करू लागला.
व्यापारी तृतीय म्हणायचे त्यांचेकडेच हे बडे जमीनदार, त्यांची पोरं ही वॉचमन, हमाली, क्लार्क, ड्रायव्हर अश्या नोकऱ्या करू लागली व जयंती साजरी करणेसाठी बड्या व्यापारी लोकांजवळ वर्गणी मागू लागली.
टप्पा ५:- २०२० ते २०३०
इथून पुढील काळ फक्त पैश्याचा असेल.
ज्यांचेकडे पैसा तोच सरपंच, तोच आमदार.
नोकरी हा विषय संपला आहे.
नोकरी शोधणारा त्यातच म्हातारा होईल.
उच्च जातीचा हताश होऊन बघत बसेल.
पैसा न कामविणाऱ्याकडे एक गुंठासुद्धा शिल्लक राहणार नाही.
शेती, नोकरीसह जो व्यवसाय करेल तोच काही कमवू शकेल.
अजून वेळ गेली नाही.
शेती सांभाळा शेती बरोबर जोडधंदे करा.
नोकरी पेक्षा व्यवसाय करण्याचा विचार करा.
जो चूक करतो तो माणूस,
तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस,
जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस.
अजुन वेळ आहे झालेल्या चुका सुधारून त्याच चुका पुन्हा होणार नाहीत हे पहाण्यासाठी.
आपल्या माणसाला साथ द्या,
आपल्या माणसाला मोठ करा.
आपल्या माणसाचे पाय ओढणे थांबवा.
आपणच आपल्या माणसाला साथ दिली पाहिजे.
(सत्य परिस्थितीवर आधारीत असलेला हा लेख सोशल मीडियावरून घेतलेला.)मला आवडलेला आहे,आपणासही नक्कीच आवडेल बघा आपल्या पुढच्या पीढ्या वाचवता आल्या तर छानच..
एक भयाण वास्तव…!
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार
[22/08, 8:33 am] Avinash Deshmukh: ग्रामसेवकाचा झाला ठेकेदार नातेवाईकांच्या नावावर घनकचऱ्याचा ठेका घेऊन मुलगाच पाहतो कामं
शेवगांव तालुक्यातील वरुर बुद्रुक आणि जोहरापुर ग्रामपंचायत च्या ग्रामसेवकाने ऑनलाईन टेंडर प्रक्रिया न काढताच दिली मर्जीतील ठेकेदारांना कामे??? झालेली विकास कामे निकृष्ट दर्जाची खातेनिहाय चौकशि करण्याची मागणी
{ अविनाश देशमुख शेवगांव }
शेवगांव तालुक्यातील वरुर बुद्रूक आणि जोहरापूर येथे दलित वस्ती सुधार नगर उत्थान मुख्यमंत्री सडक आणि पंतप्रधान पेयजल योजनेत गेल्या वर्षात लाखो रुपयांचा निधी आला आदर्श नियमांप्रमाणे ऑनलाईन टेंडर प्रक्रिया पार पडुन सदर कामांचे टेंडर देणे अपेक्षित होतें परंतु तसे न होता संबंधीत गावात नियुक्तीस असलेले ग्रामविस्तार अधिकारी यांनी गावातील पदाधिकारी याना अंधारात ठेऊन एकाच ठेकेदाराचे तीन तीन टेंडर भरून घेऊन आपल्या मर्जीतील ठेकेदाराला कामं देऊन पेय जल योजना गावांतर्गत वाडी वस्तीचे रस्ते दलित वस्ती सुधार योजनेच्या कामात निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने परिसरातील नागरिकांनी पंचायतसमिती शेवगांव आणि जिल्हापरिषद अहमदनगर चे सि.ई.ओ. यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या आहेत अनेकांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली आहे आणि पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य याना अंधारात ठेऊन लाखो रुपयांची बोगस बिले काढुन घेतल्याच्या तक्रारी झाल्या आहेत.
ताजा कलम
संबंधीत कर्मचाऱ्यांचे त्यांच्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लागेबांधे असंल्याने ते कारवाईला घाबरत नाहीत “राम नाम जपणा पराया माल अपना” यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्वच विकासकामांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे सगळा ळेल टक्केवारीचा???
विशेष बाब
कामाचा दर्जा सुमार असताना अधिकारी म्यानेज करून बिल मात्र अलगद पास करून घेतात महाशय
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार