रेल्वेमध्ये मिळणार नाही खाण्यापिण्याच्या गोष्टी, रेल्वे मंत्रालय लवकरच घेणार Pantry बंद करायचा निर्णय
भारतीय रेल्वेमध्ये अन्न, चहा, कॉफी आणि गरम सूप मिळविणे लवकरच थांबू शकते. एका वृत्तानुसार, रेल्वेच्या मोठ्या संघटनेने रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून रेल्वेमधून पॅन्ट्री कार (Pantry Car) हटवून 3AC कोच डबे लावले जावेत जेणेकरून रेल्वेला आपली कमाई वाढविण्यात मदत होऊ शकेल. रेल्वे आता यावर काय निर्णय घेईल हे पहावे लागेल. परंतु रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
पँट्री कारमधून रेल्वेला कोणत्याही प्रकारचा महसूल मिळत नाही
ऑल इंडिया रेलवेमेंन्स फेडरेशन ने रेल्वे मंत्रालयाला एक पत्र लिहिले आहे, त्यात अशी विनंती केली गेली आहे की, पँट्री कार ट्रेनमधून काढावी. मीडिया रिपोर्टनुसार AIRF ने असे म्हटले आहे की, बेस किचनमधूनही जेवण दिले जाऊ शकते. या पेंट्री कारमधून रेल्वे कोणत्याही प्रकारचा महसूल कमावत नाही.
पेंट्री कार हटविल्यामुळे रेल्वेला नुकसान होईल का?
पूर्वीच्या काही कारणांमुळे रेल्वे विमान कंपन्यांपेक्षा जोरात सुरु होत्या. परंतु कोरोना महामारीने लोकांची विचारसरणी मोठ्या प्रमाणात बदलली गेली आहे. ज्यामुळे आता लोक आरोग्याची कारणे लक्षात घेऊन विमान कंपन्यांना प्राधान्य देत आहेत. EaseMyTrip.com चे Chief executive आणि co-founder निशांत पिट्टी म्हणाले की, प्रवासी रेल्वेचे हे पाऊल सकारात्मकपणे घेणार नाहीत. स्पाइसजेटसारख्या विमान कंपन्यांनी छोट्या शहरांमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे लोक आपला वेळ वाचवण्यासाठी रेल्वेऐवजी हवाई प्रवासाकडे वळू शकतात. अशा परिस्थितीत रेल्वेच्या पँट्री कार काढण्याच्या निर्णयामुळे त्यांचे आणखी नुकसान होऊ शकते.
बेस किचन ही एक चांगली कल्पना आहेः रेल्वे मंडळाचे माजी अध्यक्ष
रेल्वे मंडळाचे माजी अध्यक्ष आर.के. सिंग म्हणाले की, बेस किचन ही एक चांगली संकल्पना आहे. रेल्वेने जास्तीत जास्त बेस किचन्स बांधली पाहिजेत. पेंट्री कारपेक्षा बेस किचनमध्ये स्वच्छतेचे पालन करणे सोपे आहे. सध्याच्या या वातावरणात स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पँट्री कार पूर्णपणे काढून टाकली पाहिजे असे मला तरी वाटत नाही. जर रेल्वे पँट्री कार काढण्याचा विचार करीत असेल तर त्यांनी जास्तीत जास्त बेस किचन्स तयार करावीत. सिंह पुढे म्हणाले की, रेल्वेने कोणताही पर्याय निवडताना हे लक्षात ठेवले पाहिजे की, प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही .





