रुपाली चाकणकराचं अध्यक्षपद धोक्यात ? डॉक्टरचा सीडीआर जाहीर करणं भोवणार

    52

    महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पत्रकार परिषदेत थेट सीडीआरच वाचून दाखवणं भोवणार असल्याचं दिसतंय. कारण यावेळी चाकणकरांनी केलेल्या विधानावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनीही थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांकडेच तक्रार केली. यावेळी फोनवरून साधलेल्या संवादात चाकणकारांच्या मताशी सहमत नसल्याचं विधान अजितदादांनी केलयं.. फलटणमध्ये चाकणकरांच्या कोणत्या विधानामुळे हा वाद पेटला आणि कुणामुळे त्यांच्या राजीनाम्या मागणी सुरू झाली तै पाहूयात…

    रुपाली चाकणकरांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या या विधानाबाबत बीडमधील तरुणानीही संताप व्यक्त केलाय… पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी करत शोले स्टाईल आंदोलन बीडमध्ये करण्यात आलंय.. तर दुसरीकडे मंत्रालय परिसरात श्रद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन करत चाकणकरांविरोधात घोषणाबाजी केली… आता हे प्रकरण चांगलंच तापलंय असून अजितदादांची नाराजी ओढवून घेणाऱ्या चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद धोक्यात आल्याची चर्चा आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here