रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्के दिनांक: ३० नोव्हेंबर २०२०, सायंकाळी ६-३० वाजता

    आतापर्यंत ६० हजार ८६५ रुग्ण बरे होऊन परतले घरी

    रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्के

    आज २७३ रुग्णांना डिस्चार्ज तर २३७ बाधितांची रुग्णसंख्येत भर

    अहमदनगर: जिल्ह्यात आज २७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६० हजार ८६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २३७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६११ इतकी झाली आहे.

    जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १११ आणि अँटीजेन चाचणीत १२२ रुग्ण बाधीत आढळले.

    जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, नेवासा ०२, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

    खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०, अकोले १३, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०४, पारनेर ०९, पाथर्डी ०२, राहाता ०५, राहुरी १७, संगमनेर ३४, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

    अँटीजेन चाचणीत आज १२२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०१, अकोले ०७, जामखेड ०३, कर्जत ०५, कोपरगाव ०७, नेवासा ०९, पारनेर १०, पाथर्डी ०५, राहाता ०८, संगमनेर ३२, शेवगाव ०९, श्रीगोंदा ०८, श्रीरामपूर १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

    दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
    मनपा ४५, अकोले १८, जामखेड ०५, कर्जत ०५, कोपरगाव १०, नगर ग्रा.०३, नेवासा १५, पारनेर १८, पाथर्डी १९, राहाता २५, राहुरी १८, संगमनेर ४८, शेवगाव १५, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर २२ आणि कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

    बरे झालेली रुग्ण संख्या:६०८६५

    उपचार सुरू असलेले रूग्ण: १६११

    मृत्यू:९३३

    एकूण रूग्ण संख्या:६३४०९

    (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

    घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

    प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

    स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

    अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

    खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

    माझेकुटुंब_माझीजबाबदारी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here