!
‘बालिका वधू’, ‘कुछ तो लोग कहेंगे’ या प्रसिद्ध मालिकांसाठीदेखील काम केलेल्या एका दिग्दर्शकावर कोरोनामुळे विकण्याची वेळ आली आहे. मात्र या अडचणीच्या काळातही कुटुंबावरचं प्रेम त्यांनी तसूभरही ढळू दिलं नाही. रामवृक्ष असं या दिग्दर्शकाचं नाव आहे. ‘सध्या मुलांच्या परिक्षा सुरु आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये येणं शक्य नाही. तसंच मुंबईतही चित्रपटांचं काम बंद आहे. त्यामुळे या काळात कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी भाजी विकत आहे’ असं सांगत ‘रियल लाईफ’ आणि ‘रील लाईफ’ मधला या दिग्दर्शकानं कृतीतून सांगितलाय.
कोरोना व्हायरसमुळे कलाविश्वाला तर सर्वात मोठा फटका बसल्याचे म्हटले जाते. अशातच उदरनिर्वाहासाठी ‘बालिका वधू’ या मालिकेच्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ आली. दरम्यान, या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्याने यावर प्रतिक्रिया दिली असून संपूर्ण टीम त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, असे म्हटले आहे.
दिग्दर्शक रामवृक्ष सध्या ते उत्तर प्रदेशमधील त्यांच्या गावी भाजी विकण्याचे काम करत आहेत. ‘बालिका वधू’ या मालिकेची टीम आता त्यांना मदत करण्यास पुढे आली आहे. ‘बालिका वधू’ या मालिकेत भूमिका साकारणारे अनूप सोनी यांनी ‘आमची बालिका वधू’ची टीम त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना जमेल त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत’, असे सांगितले.






