राहुरी पोलीस ठाण्याच्या ‘या’ पोलीस कर्मचार्याची आत्महत्या!
राहुरी पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेत काम करणारे विशाल हापसे (वय – ४० रा. देहरे ता. नगर) या पोलीस कर्मचार्याने काल (दि. २० नोव्हेंबर) रात्री आत्महत्या केली.
आत्महत्येचं कारण समजू शकलं नसल्याचं राहुरी पोलिसांनी सांगितलंय. या घटनेमुळे पोलीस दलातल्या तणावाचा विषय पुन्हा ऐरणीवर आलाय.
पोलीस कर्मचारी हापसे यांना काय त्रास होता, त्यांना नक्की कोणती समस्या होती, या कारणांचा शोध घेऊन अन्य पोलीस कर्मचार्यांना दिलासा देण्याची नितांत आवश्यकता आहे.