राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

    92

    राहरीच्या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका पार पडल्या. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने निवडणुका लढवून विजय मिळवला. या निवडणुकीत तनपुरे गटाने सर्वच २१ जागा जिंकत दणदणीत विजय प्राप्त केला आहे. या निवडणुकीत विरोधी दोन्ही गटाला एकही जागा मिळवता आली नाही. विशेष म्हणजे या निवडणुकीत अरूण तनपुरे आणि त्यांचे सुपूत्र हर्ष तनपुरे हे पिता-पुत्र प्रथमच कारखान्यात दिसणार आहेत.डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक ३१ मे रोजी पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी काल राहुरी येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयाच्या क्रीडा हॉलमध्ये पार पडली. या निवडणुकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांचे जनसेवा मंडळ व राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळ या दोन मंडळामध्ये निवडणूक चुरशीची ठरली. तर कारखाना बचाव कृती समितीला या निवडणुकीत मात्र कमी मते मिळाल्याने त्यांना तिसऱ्या स्थानावर राहावे लागले.

    उमेदवारांना मिळालेली मते.

    सोसायटी मतदार संघ (ब वर्ग) तनपुरे हर्ष अरूण (१२८, विजयी), काळे रायभान मुरलीधर (५८, पराभूत), सर्वसाधारण उत्पादक मतदारसंघ कोल्हार गट उन्हे अशोक ज्ञानदेव (७३२९, विजयी), कोळसे ज्ञानेश्वर भास्कर (६९०९, विजयी), कोळसे मच्छिंद्र गजानन (४६९२, पराभूत), घाडगे गोरक्षनाथ केशव (४२७३, पराभूत). देवळाली प्रवरा गट- दुस अरुण कोंडीराम (६८७४, विजयी), मुसमाडे कृष्णा नानासाहेब (६७४७, विजयी), वारुळे भारत नानासाहेब (६५५४, विजयी), आढाव चंद्रकांत माधवराव (४४०१, पराभूत), मुसमाडे गणेश राजेंद्र (४०२५, पराभूत), चव्हाण गोरक्षनाथ लक्ष्मण (४२९८, पराभूत), दुस आप्पासाहेब भिमराज (६७३, पराभूत), मुसमाडे सुखदेव माधवराव (५७८, पराभूत), वाकडे सोमनाथ लक्ष्मण (५३४, पराभूत). टाकळीमिया गट-करपे मीना सुरेश (७२३७, विजयी), खुळे ज्ञानेश्वर बळीराम (७०८१, विजयी), पवार ज्ञानेश्वर हरी (६२१५, विजयी), जुंदरे सुभाष भास्कर (४४८७, पराभुत), पवार चंद्रकांत भास्कर (४१५५, पराभूत), पोटे पोपट दगडू (४०४९, पराभूत), पोटे संजय सयराम (८४५, पराभूत), शिंदे सुधाकर भाऊसाहेब (५०४, पराभूत) आरडगाव गट-तारडे प्रमोद रावसाहेब (६९८३, विजयी), तारडे वैशाली भारत (६७११, विजयी), मोरे सुनील भानुदास (६७८६, विजयी), तारडे मधुकर सिताराम (४७२९, पराभूत), बानकर दिनकर कुंडलिक (४२७२, पराभूत), म्हसे दत्तात्रय अण्णासाहेब (४२००, पराभूत), कल्हापुरे अनिल भाऊसाहेब (७७५, पराभूत), डोंगरे अरूण बिरूदेव (६९८,पराभूत), गट- जवरे किसन (७४२४, विजयी), वांबोरीकारभारी ढोकणे भास्कर जगन्नाथ (७३३३, विजयी),गडाख रावसाहेब गोपीनाथ (४७७७, पराभूत), सोनवणेभास्कर मुरलीधर (४५९८, पराभूत), राहुरी गट गाडेजनार्दन उर्फ गणेश लक्ष्मण (६६७४, विजयी), तनपुरेअरुण बाबुराव (६९४७, विजयी), कोहकडे नवनाथआप्पासाहेब (४११४, पराभूत), गाडे कैलास नवनाथ(३९४९, पराभूत), गाडे अरूण चंद्रभान (५४१, पराभूत),डौले सुभाष लक्ष्मण (५०१, पराभूत), येवले राधाकिसनमाधव (४५, पराभूत), अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमतदारसंघ ठोकळे अरुण नानासाहेब (७२३६, विजयी),झारेकर नामदेव दगडू (४४६२, पराभुत), खामकर हरिभाऊगुंडाजी (६७१, पराभुत) महिला प्रतिनिधी मतदारसंघ- भुजाडी सपना प्रकाश (६७८६, विजयी) सोनवणेजनाबाई धोंडीराम (६५६५, विजयी), येवले लिलाबाईलक्ष्मण (४२६९, पराभूत), शेटे कौसल्याबाई चिमाजी(४६८९, पराभूत), धुमाळ शैलेजा अमृत (१४६०, पराभूत),पवार लताबाई गुलाबराव (६७६, पराभूत). इतर मागासवर्गमतदार संघ तनपुरे रावसाहेब यादवराव (७१३७, विजयी),शिरसाठ सुरेश महादू (४३२३, पराभूत), इंगळे दिलीपदादासाहेब (१०४०, पराभूत) भटक्या विमुक्त जाती विशेषमागास प्रवर्ग तमनर अशोक सिताराम (७५८७, विजयी),विटनोर अण्णा लक्ष्मण (४८५४, पराभूत) अशी मते पडलीआहेत. या निवडणुकीच्या निकालात सकाळी मतदानमोजणी सुरू झाल्यापासून जनसेवा मंडळाचे सर्व उमेदवारआघाडीवर होते. अखेर ही विजय घोडदौड चालू ठेवतजनसेवा मंडळाने हा दणदणीत विजय मिळवला

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here