दि. 9 (जिमाका): कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांच्यावतीने शनिवार दि. 11 डिसेंबर 2021 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा व्ही.व्ही.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील औद्योगिक न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय आणि शाळा न्यायाधिकरण येथे आभासी तंत्रज्ञान व प्रत्यक्षरित्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी केले आहे . जिल्हा व सत्र न्यायालय, कोल्हापूर तसेच सर्व तालुका न्यायालय कळे, खेरीवडे, मलकापूर , पन्हाळा , कागल , कुरुंदवाड, इचलकरंजी, आजरा, चंदगड, गडहिंगलज, जयसिंगपूर, पेठवडगाव, राधानगरी येथे आयोजीत राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र व प्रलंबीत वाद तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. यासाठी पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी केले आहे. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे ,१३८ एन. आय. ॲक्ट प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटर वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बॅंकेशी संबधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये टेलिफोन, मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश यामध्ये असणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार असून दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झालेल्या न्याय निवाड्याचे तडजोडीने समाधान दोन्ही पक्षकारांना होत असते . कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व पक्षकार,अधिवक्ता आणि न्यायालयातील कर्मचारी व पॅनल सदस्य यांच्या सुरक्षितेच्या दुष्टीकोनातून व्हॉटसॲप व आभासी तंत्रज्ञानाव्दारे संबंधीत पक्षकारांची ओळख आधीच निश्चित करून लोकन्यायालयाच्या दिवशी तडजोडीमधील अटी व शर्ती नोंदविता येण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आलेली असून जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. देशपांडे यांनी केले आहे . अधिक माहिती करीता ०२३१-२५४१२९५ या क्रमांकावर संपर्क साधाव.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 84 कोरोना रुग्णांची नोंद, एकही मृत्यू नाही
Maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येच चढ-उतार होत आहेत. सोमवारी राज्यात 84 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली...
चांद्रयान-३ मोहीम अयशस्वी ठरली तर…
इंडिया टुडे सायन्स डेस्कद्वारे: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने म्हटले आहे की चंद्रयान -3 मोहीम या...
Mahapalika : व्यावसायिकांकडून परवाना शुल्क आकारण्याचा निर्णयच बेकायदेशीर : दीप चव्हाण
Mahapalika : नगर : शहरातील व्यावसायिकांकडून नव्याने परवाना शुल्क आकारण्यासंदर्भात महापालिकेने (Mahapalika) शासनाची मंजुरी घेतलेली नाही. तर दर करची सूची...
चांद्रयान रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेते, इस्रो 2 सप्टेंबरला सूर्य मोहीम पाठवणार आहे
चांद्रयान-३ लँडर मॉड्यूलने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीपणे उतरून इतिहास रचल्यानंतर पाच दिवसांनी, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो)...




