
अरकान जहागीरदार, अशिष सुसरे व कु. ऋतुजा करमरकर यांना उत्कृत मेमोरीयल मध्ये प्रथम तर मूट ट्रायल मध्ये द्वितीय पारितोषिक.
अहमदनगर – नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे एन.बी.टी. लॉ कॉलेज व ॲड. डी. टी. जायभावे ट्रस्ट चे वतीने आयोजीत दोन दिवसीय १५ वे राष्ट्रीय स्तरीय मूट कोर्ट स्पर्धे मध्ये अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाजाचे न्यु लॉ कॉलेज च्या एल. एल. बी. अंतिम वर्षाचे विदयार्थी शेख अरकान हाफिज जहागीरदार, अशिष संभाजी सुसरे व कु. ऋतुजा सुशांत करमरकर यांनी उत्कृष्ठ मेमोरीयल मध्ये प्रथम पारितोषीक व मूट ट्रायल मध्ये दुस-या क्रमांकचे पारितोषीक पटकावले.
विधी महाविदयालयात कायदयाचे शिक्षण घेणा-या विदयार्थ्याना प्रत्यक्ष न्यायालयात खटले कसे चालविले जाते याचे प्रत्यक्ष ज्ञान देण्याच्या उद्देशाने मूट कोर्ट चा उपक्रम राबविण्यात येतो त्या अनुषगांने नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे एन. बी. टी. लॉ कॉलेज व ॲड. डी.टी. जायभावे ट्रस्ट चे वतीने ११ मार्च २०२३ व १२ मार्च २०२३ रोजी दोन दिवसीय १५ वे राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले होते. अशा प्रकारची मूट ट्रायल स्पर्धा ही भारतातील एकमेव स्पर्धा असून सन २००६ पासुन या स्पर्धेचे आयोजन करण्यांत येते सदर स्पर्धे मध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट ॲक्ट चे कलम १३८ प्रमाणे फौजदारी खटला व मुस्लिम कायदया चे तरतुदी प्रमाणे हिबा (बक्षीसपत्र) चा दिवाणी दावा असे दोन खटल्याची सुनावणी घेण्यात आली सदर स्पर्धे मध्ये देशभरातील ३२ विधी महाविदयालयानी सहभाग घेतलेला होता त्या मध्ये न्यु लॉ कालेज अहमदनगर या विधी महाविदयालया चे वतीने एल.एल.बी. अंतिम वर्षाचे विदयार्थी शेख अरकान हाफिज जहागीरदार यांनी फौजदारी खटल्यात फिर्यादी तर्फे व दिवाणी दाव्यात वादी तर्फे तर अशिष संभाजी सुसरे यांनी आरोपी व प्रतिवादी तर्फे कामकाज पाहिले दोन्ही खटल्यात न्यायाधिश म्हणुन कु. ऋतुजा सुशांत करमरकर हिने काम पाहिले या मध्ये न्यु हॉ कॉलेजच्या विदयार्थ्याना उत्कृष्ठ मेमोरीयल मध्ये पहिले तर मुट ट्रायल मध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषीक गोखले एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एम.ए. गोसावी, बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा चे सदस्य कायदे तज्ञ डॉ. ॲड. उदय वारुंजीकर व ॲड. जयंत जयभावे यांचे हस्ते मानचिन्ह व रोख पारितोषीक देण्यांत आले.
राष्ट्रीय स्पर्धेत न्यु लॉ कॉलेजच्या विदयार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगीरी करुन स्पर्धेत पारितोषीक मिळविल्या बद्दल न्यु लॉ कॉलेजचे प्राचार्य श्री.एम.एम.तांबे, प्रा.डॉ. पांढरे, प्रा.डॉ.मोरे, प्रा.पाचे, प्रा.भवाळ, प्रा.तोरडमल, प्रा.वडेपल्ली, प्रा.ॲड. काकडे मॅडम आदीनी अभिनंदन
केले आहे.