राष्ट्रीय क्रीडा दिन : राष्ट्रीय गट दिना आव्हाड प्रतिष्ठानकडून पार्थ स्पोर्ट्स लीगचे प्रश्न

    163

    पाथर्डी : अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान (Abhay Awad Social Foundationयांच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त (National Sports Dayपाथर्डी शहरातील दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पार्थ स्पोर्ट्स लीगचे (Parth Sports Leagueआयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड,उपाध्यक्ष अँड.सुरेश आव्हाड,प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, विश्वस्त डॉ. बबन चौरे, मुख्याध्यापक शरद मेढे, स्वामी समर्थ विद्यामंदिरचे मुख्याध्यापक एकनाथ ढोले, स्वस्तिक कौशल्य विकासचे संचालक संदीप काटे,अनुजा कुलकर्णी, संपत घारे, ज्ञानेश्वर गायके, विजय देशमुख उपस्थित होते.

    ही स्पर्धा दोन गटात घेऊन विविध क्रीडा प्रकार घेण्यात आले. यात ४० मीटर धावणे, ५० मीटर धावणे, लंगडी, थ्रो बॉल व पोत्यांची शर्यत,संगीत खुर्ची, पायाने फुगे फोडणे अशा विविध मैदानी व मनोरंजक स्पर्धा झाल्या. शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिकच्या १४ शाळेतील ३४५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. सहभागी शाळांना अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानकडून डिजिटल नोटीस बोर्ड भेट देण्यात आले. प्रत्येक क्रीडा प्रकारातून प्रथम तीन क्रमांकांना बक्षिसे देण्यात आली.

    यावेळी अभय आव्हाड म्हणाले की,खेळामुळे माणूस परिपूर्ण बनून  विद्यार्थ्यांमध्ये विविध गुण निर्माण होतात. प्रत्येक व्यक्तीचे मन,मेंदू व मनगट यांचा विकास खेळामुळेच साधून यश अपयश पचवण्याची ताकद निर्माण होते.

    ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रावसाहेब मोरकर,प्रमोद हंडाळ, सतीश बोरुडे तुकाराम मरकड,सचिन शिरसाट, वर्षा ढाकणे,जयश्री एकशिंगे मनीषा गायके, आशा बांदल,राधिका सरोदे, ज्योती हम्पे, दुर्गा भगत,सीमा फासे, गीता भावसार ज्ञानेश्वरी मुऱ्हे यांनी  परिश्रम घेतले.  

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here