राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात कर्मचारी असलेल्या एका व्यक्तीने तरुणीला बायको घरी नसताना घरी बोलावले.

598

नागपूर इथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात कर्मचारी असलेल्या एका व्यक्तीने चक्क एका तरुणीला स्वतः विवाहित असल्याचे लपवून तिच्यासोबत प्रेमाचे नाटक केले आणि पुढे तिच्याबरोबर शारीरिक संबध प्रस्थापित केले. मात्र अखेर तो विवाहित असल्याची माहिती या प्रेयसीला समजली आणि तिने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. रूपेश लक्ष्मण लांडगे (३८, रा. पुणे) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा पुणे येथील रहिवासी आहे .

उपलब्ध माहितीनुसार, रूपेश लांडगे हा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात शासकीय कर्मचारी आहे. १ जानेवारी २०१५ मध्ये एसटी प्रवासादरम्यान ३२ वर्षीय युवती आणि आरोपीची नागपुरात गणेशपेठ बस स्थानकावर ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले आणि चॅटिंग सुरू झाले. हळूहळू त्यांच्यात मैत्री वाढत गेली अन मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. ओळख झाली त्यावेळी युवती खासगी कार्यालयात नोकरी करीत होती.रूपेशने तिला खाजगी नोकरी सोडून दे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी कर, असा सल्ला दिला आणि त्यासाठी लागेल ती मदत देखील करण्याची तयारी दाखवली . त्यानंतर तिने जॉब सोडला आणि पुण्यात जाऊन स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागली.

ती पुण्यात आणि तो देखील मूळचा पुण्याचा असल्याने पुण्यातून नागपूरला दोघेही बरोबरच येत जात असतं. असेच एकदा दोघेही पुण्यावरून नागपुरात आल्यानंतर रुपेशने तिला गणेशपेठ बसस्थानकाजवळ एका लॉजमध्ये तिला नेले आणि लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. काही कालावधीनंतर हा प्रकार सातत्याने सुरु झाला. रुपेश मूळचा पुण्याचा असल्याने त्याने या तरुणीला बायको घरी नसताना असेच एकदा घरी देखील बोलावले.

तरुणी रूपेशला भेटायला पुण्यातील त्‍याच्या घरी गेली मात्र एका कोपऱ्यात तिला एक फोटो झाकून ठेवलेला दिसला. रुपेशच्या नकळत तिने तो फोटो पाहिला आणि तिला धक्काच बसला. बायकोचा फोटो टॉवेलखाली लपवून हा चक्क आपल्याला अविवाहित असल्याचे सांगून फसवणूक करतोय हे तिच्या लक्षात आले. बायकोसोबत त्याचा फोटो दिसल्याने तिने त्याला प्रश्न विचारला असता दोघांमध्ये भांडण सुरु झाले. आपली रुपेशने फसवणूक केल्याचे लक्षात येताच तरुणीने तात्काळ गोंदिया इथे पोहचत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गणेशपेठ, बसस्थानक हे घटनास्थळ असल्याने हे प्रकरण गणेशपेठ पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून तपास सुरु आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here