राष्ट्रवादी काँग्रेस च्या दणक्या नंतर नळाला पाणी आले, भिंगार बंद ला तूर्त स्थगिती!
छावणी परिषदेवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाला यश. मंगळवारी भिंगार बंद’चा निर्णय मागे – मतीन सय्यद
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरांमध्ये पाणी सुटत नसल्याने भिंगार येथील नागरिकांच्या वतीने भिंगार शहर मंगळवारी बंद ठेवण्यात येणार होता त्यामुळे छावणी परिषदेने पाणी सोडल्याने आंदोलन यशस्वी पार पडले आहे आंदोलनाची दखल घेत आज पाणी सोडण्यात आले आहे.
त्यामुळे भिंगार बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे कारण सोमवारी काही लोकांनी भिंगार बंदचा निर्णय घेतला असून मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बंदची घोषणा करण्यात आली होती त्यामुळे भिंगार शहर हे दोन दिवस बंद राहून आर्थिक नुकसान होऊ शकते.
अगोदरच लोक डॉन मुळे व्यापाऱ्यांची आर्थिक नुकसान झाले असून भिंगार दोन दिवस बंद ठेवल्याने व्यापाऱ्यांच्या आर्थिक नुकसान होईल त्यामुळे भिंगार बंद’चा निर्णय मागे घेण्यात आला आहे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नियमित पाणीपुरवठा साठी आमचा लढा प्रशासनाची चालू राहणार असल्याचे प्रेस नोट मध्ये म्हटले आहे.