ठाणे (प्रतिनिधी)- अतिवृष्टीमुळे कोकणाची पुरती वाताहत झाली आहे. कोकणी माणसांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हे संसार उभे करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या असतानाच पुरामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि सय्यद अली अश्रफ यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन सदस्य तथा विधानसभा क्षेत्राध्यक्ष शमीम खान आणि विरोधीपक्ष नेते अशरफ शानू यांनी कोकणात वैद्यकीय साधनांसह 12 डाॅक्टरांची टीम कोकणात रवाना केली.
कोकणाला पुराचा मोठा फटका बसला आहे. या पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या पूरग्रस्तांना साह्य करण्याची संकल्पना गृहनिर्माण मंत्री ना. डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. त्यानुसार गेले दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तू कोकणात पाठविण्यात येत आहे. आजही विरोधीपक्ष नेते अशरफ शानू आणि पठाण परिवहन सदस्य तथा विधानसभा क्षेत्राध्यक्ष शमीम खान यांनी, बिस्लेरी पाण्याच्या बाटल्यांचे एक हजार बॉक्स, क्रीम बिस्किटांचे पंधरा हजार पाकिटे, तीन हजार ब्लॅन्केट, तीन हजार चादर, सातशे चटई या जीवनावश्यक साहित्याचे ट्रक डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते आनंद परांजपे , सय्यद अली अश्रफ, यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आले. याचवेळेस बारा डाॅक्टर, ईसीजी यंत्र अन् तंत्रज्ञ, औषधांनी सुसज्ज रूग्णवाहिकादेखील यावेळी कोकणाच्या दिशेने रवाना करण्यात आली.
दरम्यान, कोकणावर आलेले हे अस्मानी संकट सहन करण्यापलीकडे आहे. तेथील लोकांचे संसार उभे करून देण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे कोकणातील पूरग्रस्तांना स्थिरस्थावर करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शन आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही असे जीवनावश्यक साहित्य कोकणात पाठवतच राहू, असे शमीम खान आणि शानू पठाण यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक सिराज डोंगरे , नगरसेविका हाफिजा नाईक, सुलोचना पाटील, नगरसेवक मोरेश्वर किणे, हिरा पाटील, रेहान पितलवाला, शोएब खान, मुमताज शहा, इम्रान सुर्मे, शाकिर शेख, साकिब दाते, शोएब, इम्तियाज ऊर्दू, मुफ्ती अश्रफ शेख, मौलाना अझर, नेहा नाईक, मेहफूज मामा, गणेश मुंडे, बबलू शेमणा, रफी मुल्ला, करीम खान, सुफियान खान, आतिक खांचे, सरफराज काझी, इशरतभाई, अमीर भाई, सकिना खान, पुजा खान, वनिता भोर, मिनाझ शेख, शाईना आझमी, आयशा काझी, लखबीरकौर आदी उपस्थित होते.



