- राशीन येथील नामांकीत डॉ महेंद्र थोरात त्याची पत्नी दोन मुले हे आज आपल्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कर्जत तालुक्यातील राशीन येथील नामांकित व सर्वात जास्त रुग्णांना सेवा देऊन लोकांच्या गळ्यातील ताईत असलेले डॉ महेंद्र जालिंदर थोरात (वय 47) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेतला असल्याचे उघड झाले तर त्याची पत्नी वर्षा महेंद्र थोरात (वय 41), याचे सह दोन मुले कृष्णा (वय 15) व कैवल्य (वय 5) हे तिघेही घरात मृत अवस्थेत आढळले. आज सकाळी डॉक्टरांना अनेक फोन करूनही त्याचे कडून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने कंपाउंडर व इतर लोक त्याचे घरी पोहचले दार वाजवले मात्र तरीही दार न उघडले गेल्याने शेवटी पोलिसांना बोलावून दार तोडून घरात प्रवेश केला असता अत्यंत धक्कादायक चित्र समोर आले. सदर घटना दि 19 फेब्रु च्या रात्री घडली असून याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उप निरीक्षक सोमनाथ दिवटे, यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली ही घटना कळताच अनेकांनी डॉ थोरात यांच्या श्रीराम हॉस्पिटल कडे धाव घेतली या अकस्मात दुर्घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून वैद्यकीय क्षेत्रामुळे सर्वांच्या संपर्कात असलेल्या डॉ थोरात यांनी असे का केले असा प्रश्न उपस्थित होत आहे हा घातपात आहे का आनखी दुसरे काही याबाबत पोलीस कसुन तपास करत आहेत.
