
रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटणारी टोळी कोतवाली गुन्हे शोधपथकाकडुन जेरबंद, २
दिवसांची पोलस कोठडी
दि. १०/०३/२०२३ रोजी रात्री १०.०० ते १०.३० वाजण्याचे दरम्यान फिर्यादी श्रीमंत कोंडीबा पवार वय ७० वर्षे धंदा-सिक्युरिटी गार्ड, रा. द्रौपदी दुधसंघाशेजारी, एकनाथनगर, नेप्तरोड, केडगांव, अहमदनगर हे नेवासकर पेट्रोलपंपाचे समोरुन घराकडे जात असतांना एका मोटारसायकल तीन अनोळखी इसम आले व फिर्यादीच्या खिशातील १८२०/- रोख रक्कम ही बळजबरीने काढुन घेवुन पळुन गेले आहेत. वगैरे मजकुरच्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं । २४७/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. सदरचा गुन्हा हा मोईन बादशहा शेख शेख वय २२ वर्षे रा बडी मशिदसमोर, मुकुंदनगर जि अहमदनगर व त्याचे साथीदारांनी मिळुन केला असून गुन्हयात वापरलेली निळया रंगाची मोटारसायकल सह ते माळीवाडा वेशीजवळ येणार आहे. अशी माहिती मिळाल्याने पोनि चंद्रशेखर यादव सो यांचे आदेशाने गुन्हे शोध पथकाने माळीवाडा वेस येथे सापळा लावला असता तेथे काही वेळाने निळया रंगाची एक मोटारसायकलवर दोन इसम आले त्यांना पथकाने थांबण्याचा इशारा केला असता ते पळुन जावु लागले त्यास पथकाने मोठया शिताफीने पकडुन त्यास त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) मोईन बादशहा शेख शेख वय २२ वर्षे रा बडी मशिदसमोर, मुकुंदनगर जि अहमदनगर २) शाहरुख आलम शेख वय२७ वर्षे रा नागरदेवळे ता नगर अहमदनगर असे असल्याचे सांगुन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंघाने चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेवून चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा आम्ही तिघांनी मिळुन केला असल्याची कबुली दिली असुन त्यांचे कडुन गुन्हयातील गेला माल १८२०/- रु रोख व गुन्हयात वापरलेली पॅशन प्रो मोटारसायकल नं एमएच १६ ए के ४५६४ असा एकून ४१,८२०/- रु किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे, यातील अटक आरोपी यांनी मागील सहा महिन्यांमध्ये बसस्थानक परिसरात लुटमार केली असुन आणखी गुन्हे उघडकीस येत आहेत सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ शरद गायकवाड हे करीत असून अटक आरोपी नामे मोईन बादशाह शेख याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
पोलीस स्टेशन
गुन्हा रजि क्रं
११.
२
कोतवाली पो.स्टे अहमदनगर कोतवाली पो. स्टे अहमदनगर
३
कोतवाली पो.स्टे अहमदनगर
४
नगर तालुका पो.स्टे अहमदनगर
५.
शेवगाव पो.स्टे अहमदनगर
| ३९८/२०२० भादवि ३९२, आर्म अॅक्ट ४/२५
| ४३६/२०२० भादवि ३९४,३४
| ४९७/२०२० भादवि ३९२, ३४ सह आर्म अॅक्ट ४/२५
। ५६१ / २०१९ भादवि ३९३, ३४
| ६५/२०२१ भादवि ३७९
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सोो, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कातकाडे सोो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सो, पोसई मनोज कचरे, पोहेकॉ शरद गायकवाड, पोहेकॉ / गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना/ अब्दुलकादर इनामदार, पोना/ योगेश खामकर, पोकॉ/ संदिप थोरात, पोकॉ/ अमोल गाढे, पोकॉ/ सुजय हिवाळे, पोकॉ/ कैलास शिरसाठ, पोकॉ/ सोमनाथ राऊत, पोकॉ/सागर मिसाळ यांच्या पथकाने केली आहे.





