रात्रीचे वेळी घराचे दरवाजे उघडून मारहाण करुन लुटमार करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

548

रात्रीचे वेळी घराचे दरवाजे उघडून मारहाण करुन लुटमार करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

रात्रीचे वेळी घराचे दरवाजे उघडून मारहाण करुन लुटमार करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी कि, दिनांक ०८/०८/२०२१ रोजीचे रात्री फिर्यादी श्री. दिलीप संभाजी पवार, वय ३८ वर्षे, रा. भगूर, ता. शेवगाव हे त्यांचे कुटुंबासह घरामध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात आरोपींनी त्यांचे घराचा दरवाजा वाजविला. त्यावेळी फिर्यादी यांनी घराचा दरवाजा उघडला असता आरोपींनी घरामध्ये प्रवेश करुन फिर्यादी व फिर्यादीचे आईस लोखंडी गजाने मारहाण करून सोन्याचे दागिणे, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ३९,००० रु. किं. चा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत शेवगाव पो.स्टे. येथे गुरनं. ४७८/२०२१ भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर यांचे सुचनानुसार श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक समांतर तपास करीत असताना पोनि/ अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा घान्या उर्फ शिवम काळे, रा. साकेगाव, ता. पाथर्डी याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि / सोमनाथ दिवटे, सपोनि/गणेश इंगळे, पोहेकॉ/ दत्तात्रय हिंगडे, सुनिल चव्हाण, मनोहर गोसावी, पोना/दिपक शिंदे, शंकर चौधरी, पोकों/ सागर ससाणे, रणजित जाधव, सागर सुलाने, रोहीत येमूल, चालक पोहेकॉ/ उमाकांत गावडे अशांनी मिळून पाथर्डी येथे जावून आरोपीचे ठाविठकाणाबाबत गोपनिय माहीती घेवून व शोध घेवून आरोपी नामे १) अनिकेत उर्फ पान्या उर्फ शिवम वैभव काळे, वय २० वर्षे, रा. साकेगाव, ता. पाथर्डी यांस साकेगाव परिसरातून पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास विश्वसात घेवून कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याने व त्याचे इतर चार साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीचे आधारे आरोपीतांचा शोध घेवून आरोपी नामे २) सेशन उर्फ रोशन उर्फ सेशा रायभान भोसले, वय ३० वर्षे, रा. साकेगाव, ता. पाथर्डी यास ताब्यात घेतले. उर्वरित तीन साथीदारांचा शोध घेतला. परंतु ते मिळून आले नाहीत.

ताब्यात घेतलेल्या वरील नमुद दोन आरोपीकडून गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालापैकी ७,०००/- रु. किं. चा विवो कं. चा मोबाईल जप्त करून आरोपींना मुद्देमालासह शेवगाव पो.स्टे. येथे हजर करण्यात आलेले असून पुढील कार्यवाही शेवगाव पो.स्टे. करीत आहेत.

आरोपी अनिकेत उर्फ घान्या उर्फ शिवम वैभव काळे याचे विरुध्द यापूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

१) पैठण पो.स्टे. औरंगाबाद गुरनं. २) रहिमतपूर पो.स्टे. सातारा गुरनं.

२०८/२०१७ ९९/२०१९,

भादवि कलम ४५७, ३८०

भादवि कलम

३६३, ३६६, ३७६, ३२३, ५०४, ५०६, ३४ सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. सुदर्शन मुंढे साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, शेवगाव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here