- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील अधिवेशनात एमपीएससीमार्फत काही दिवसांत रिक्तपदांची भरती होईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही जवळपास साडेपंधरा हजार पदांची भरती आयोगामार्फत होईल, असे स्पष्ट केले होते. त्याची कार्यवाही सुरू झाली, परंतु अजूनही आठ हजार पदांचे मागणीपत्र आयोगाकडे सादर करण्यात आलेले नाही. मात्र, काही दिवसांत संबंधित विभागातील रिक्त पदांचे मागणीपत्र आयोगाला पाठविले जाणार असून नववर्षात त्या पदांची भरती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
- *’एमपीएससी’कडे प्राप्त मागणीपत्र…*
- *विभाग भरती होणारी पदे*
- वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये : 1572
- गृह : 1159
- सामान्य प्रशासन : 957
- सार्वजनिक आरोग्य : 937
- कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय : 924
- वित्त : 356
- जलसंपदा : 323
- उद्योग, ऊर्जा, कामगार : 279
- विधी व न्याय : 205
- कौशल्य विकास, उद्योजकता : 171
- महसूल व वन : 104
- शालेय शिक्षण, क्रीडा : 105
- नगरविकास : 90
- अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण : 62
- नियोजन : 55
- उच्च व तंत्रशिक्षण : 35
- सहकार, पणन, वस्त्रोद्योग : 32
- ग्रामविकास व पंचायतराज : 32
- बृन्हमुंबई महापालिका : 21
- मराठी भाषा : 21
- पाणी पुरवठा व स्वच्छता : 16
- पर्यावरण : 3
- मृदा व जलसंधारण : 11
- आदिवासी विभाग : 7
Home महाराष्ट्र राज्य सरकारच्या 25 विभागांतील 15,511 रिक्त पदांची भरती एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे नियोजन..






