
देवेंद्र फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (10 जून) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ करण्यात आली आहे. पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10000 रूपयांची वाढ केली आहे. बीएससी नर्सिंग आणि व्यवसायोपचार अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनाही विद्यावेतनात वाढ मिळणार आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.