राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड

    17

    अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णयानुसार पत्र जाहीर केले आहे त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करताना माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, माजी नगरसेवक सनी सूर्यवंशी, संतोष लांडे, संतोष ढाकणे, दीपक खेडकर, मयूर कुलथे आदी उपस्थित होते.यावेळी प्रा. माणिकराव विधाते म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांचे प्रश्न मार्गी लागणार आहे त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील खेळाडू प्रशिक्षक यांचे प्रश्न जलद गतीने सुटण्यासाठी मदत होईल क्रीडा क्षेत्राला वैभव प्राप्त करून देतील आमदार संग्राम जगताप यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून खेळाडूंना खेळण्यासाठी मैदानी निर्माण व्हावी यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे असे ते म्हणाले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here