राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी मानसिक तणावात; कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून पगार नाही.वाहतूक विभागाचा ढिसाळ कारभार-

वाहतूक विभागाचा ढिसाळ कारभार- कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून पगार नाही .राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी मानसिक तणावात;

पगाराच्या थकबाकीमुळे एसटी कर्मचार्‍यांना त्रास होत आहे, जळगाव येथील मनोज चौधरी रत्नागिरी येथील कर्मचारी कंडक्टरच्या आत्महत्येमुळे कॅम्पसमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. चौधरी म्हणाले की एसटी महामंडळातील अपूर्ण पगाराची कामे व कामांच्या अनिश्चिततेमुळे त्यांनी आत्महत्या केली. हे प्रकरण ताजे असतांना संगमनेर आगारातील बस कर्मचाऱ्यांच्या समस्या डोके वर काढत आहे. मुंबईकरांची वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून राज्य परिवहन मंडळाची लालपरी मुंबईत सध्या बेस्टच्या मार्गावर धावत आहेत. या सेवेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून म्हणजे राज्याच्या ३६ विभागातून बसेस, चालक वाहकासहीत मुंबईत दाखल झालेले आहेत. सदर चालक वाहकांची व्यवस्था होत आहे की नाही. त्यांना जेवण मिळते की नाही ? यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याकडे लक्ष द्यायला राज्य परिवहन मंडळाला किंवा राज्य सरकारला अजिबात वेळ नाही. राज्य परिवहन मंडळाच्या वाहतूक विभागाच्या ढिसाळ नियोजना मुळे संबंधित कर्मचाऱ्यांना पगार तर सोडाच पण निलंबनाच्या नावा खाली कर्मचाऱ्यांचवर अप्रत्यक्षपणे हुकूमशाही लादली जात असल्याचे दिसते. प्रत्यक्षात ३६ विभागातून बोलवलेल्या बसेस व कर्मचारी हे सर्व धाब्यावर बसवले असून फक्त १० च विभाग कार्यरत आहेत आणि या १० विभागात नंबर लागला तो संगमनेर आगाराचा. असंख्य चालकांना मुंबईतील बेस्टचे मार्ग माहीत नसल्याने ते तणावाखाली काम करीत आहे .याचा प्रत्यय संगमनेर आगारातील चालक ननकर यांचे निधन! राज्य परिवहन मंडळाच्या परिवहन विभागाने दिलेला तणाव व निलंबनाचे कारण ? तर वाहक वाबळे हे रूग्णालयात अँडमिट असताना संगमनेर आगारातील अधिकारी यांच्या दमबाजीमुळे सलाईन अर्धवट सोडून आगारात हजर झाले.  हे तर सोडाच महाराष्ट्र सरकार करोना संसर्गाचा बिमोड करण्यासाठी सरसावले असताना राज्य परिवहन कर्मचाऱ्यां कडून संसर्ग वाढण्याची भीती तयार होत आहे. सदर कर्मचारी वर्गाला आगारातून काळजी घेण्यासाठी मास्क, सँनिटाझर किंवा प्रादुर्भाव होवू नाही म्हणून घेण्याची काळजी हे सुद्धा सांगितले जात नाही. यासाठी विविध संघटना, श्री यशोदेव पतसंस्था सारख्या दात्यांनी मुंबईला ड्युटीवर चाललेल्या चालक वाहकांना मास्क, सँनिटाझर चे वाटप करून माणुसकीचा धडा शिकवला पण हे राज्य परिवहन मंडळाला जमले नाही. असे समजते की आज संगमनेर आगारातील कर्मचारी मुंबईहुन ड्यूटी करून आल्या नंतर करोना संसर्गाच्या विळख्यात   22 जण सापडले आहेत तर काहींचे रीपोर्ट येणे बाकी आहे. बस मध्ये ५० पेक्षा जास्त प्रवासी असल्याने व एखादा  प्रवासी करोना बाधित असला तर मुंबईहून ड्यूटी बजावून आलेल्या चालक वाहकांना आगारातून परिसरातील गावांना ड्युटी करण्यासाठी अधिकारी सक्ती करीत असून यामुळे कोरोना संसर्ग वाढेल का कमी होईल याचा विचार करायला कोणाकडे वेळ नाही. यामुळे सर्वसामान्य जनता एसटी प्रवास करायला टाळत असून बसेस रिकाम्या ये जा करताना दिसत आहे मग परिवहन मंडळाला नफा कसा होणार ? यामुळे संगमनेर आगारातील विविध संघटना व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन विभाग नियंत्रक अ.नगर यांना पत्र देवून कर्मचाऱ्यांना सवलत द्यावी असे म्हटले आहे. पण हा कर्मचारी आवाज राज्य सरकारला ऐकू येईल काय ? असा सवाल राज्यपरिवहन कर्मचारी करीत आहे. याबाबत संगमनेर आगार प्रमुख बी. एम. शिंदे यांच्याशी  अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here