महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे सावट सर्वाधिक आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सर्वकाही ठप्प आहे. यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंटस् देखील बंद आहेत. आता काही प्रमाणात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंटस् आता सुरू करण्यात येणार आहेत. आज दि. ५ ऑक्टोबरपासून ५० टक्केपेक्षा जास्त क्षमतेने हॉटेल्स सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यामध्ये
??ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी.
??सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.
??ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा.
??ग्राहकांसाठी सॅनिटायजर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
??डिजीटल माध्यमाद्वारे चलन देण्यास प्रोत्साहन द्यावे.
??रेस्टरुम आणि हात धुण्याच्या जागांची वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
??एसीचा वापर कटाक्षाने टाळावा.
??सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असाव्या.
??क्युआर कोडसारख्या माध्यमातून संपर्करहीत मेनुकार्ड उपलब्ध करावे.
??मेनुमध्ये शक्यतो शिजवलेल्या पदार्थांचा समावेश असावा.
??टेबल, खुर्च्या, काऊंटर आदी जागांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
??बुफे सेवेला परवानगी नसेल.
??ग्राहकाचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आदी माहिती घेण्यात यावी.
??कर्मचाऱ्यांची कोव्हीड चाचणी करणे अत्यावश्यक आहे.
??एन ९५ किंवा याच दर्जाचा मास्क कर्मचारी वापरतील याची खात्री करावी



