
राज्यातल्या वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीने सरासरी 2 रुपये 35 पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगापुढे सादर करण्याची तयारी केली आहे. तिन्ही वीज कंपन्यांची दरवाढ मान्य झाल्यास वीज पुरवठ्याचा सरासरी दर अकरा रुपये प्रति युनिटवर जाण्याची भीती असून ही दरवाढ सुमारे 51 टक्के असेल. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी दरवाढ होऊ नये यासाठी सरकारला हस्तक्षेप करावा लागणार आहे.
तिरुपती मंदिरात दर्शनासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू
देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान समजल्या जाणाऱ्या तिरुपतीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक जातात. तिरुमला तिरुपती देवस्थान समितीतर्फे तिकिटांचा ऑनलाइन कोटा आजपासून म्हणजेच 9 जानेवारी 2023 रोजी त्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून ऑनलाइन पद्धतीने तिकीट बुकिंग सुरू करण्यात येत आहे.
ब्राझीलच्या संसद, राष्ट्रपती भवन, सुप्रीम कोर्टात घुसून हजारो नागरिकांची तोडफोड
ब्राझीलच्या संसदेत मोठी घटना घडली आहे. ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी संसद भवनात गोंधळ घतला. नवे राष्ट्रपती म्हणून लुइज इनासियो लुला डि सिल्वा यांनी शपथ घेतल्याने बोलसोनारो यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. या आंदोलकांनी थेट बाझिलच्या संसद, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयात घुसून धुडगूस घातला आहे. प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेकडो निदर्शकांना अटक केली.
‘हा’ ठरला ‘बिग बॉस मराठी 4’चा विजेता
अक्षय केळकर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा महाविजेता ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते महाविजेत्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर एक घर, 16 स्पर्धक आणि 100 दिवसांचा प्रवास संपला आहे. अपूर्वा आणि अक्षय केळकर हे दोन स्पर्धक अंतिम टप्प्यात होते. यात अक्षय केळकरने बाजी मारली आहे.
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘या’ पैलवानाने पटकावला हिंदकेसरी खिताब
महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पैलवान अभिजीत कटके याने हिंदकेसरी खिताब पटकावलाय. हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटकेने खुल्या गटातून हा मान मिळालाय. अंतिम फेरीत अभिजीने हरियाणाच्या सोमवीरचा 5-0 असा पराभव केलाय. अभिजीतने पटकावलेला हिंदकेसरीचा किताब म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे.



