
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी बोलावली आहे. या सुनावणीला सुरुवात झालीय.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

या सुनावणीनंतर 34 याचिकांच्या सुनावणीचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. पण दोन्ही बाजूचा युक्तिवाऐकूण घेतल्यानंतर वेळापत्रक जाहीर होणार आहे. विधीमंडळ ही स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या दबावाला बळू पडून, घाईने हा निर्णय घेणं योग्य नाही. दोन्ही बाजूचे मुद्दे ऐकून घेतल्यानंतर निर्णय घेतला जाईल. शेवटी प्रत्येकाला न्याय मिळायला हवा, अशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका आहे.Ahmednagar Rain अहमदनगरमध्ये पाणी तुंबण्याला महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे चारठाणकर साहेबच जबाबदार ? वाचा सविस्तरठाकरे गटाकडून वकील असीम सरोदे हे आजच्या सुनावणीवेळी बाजू मांडत आहेत, अशी माहिती मिळत आहे.पुढील सुनावणी कशी घेणार आहात? वेळापत्रक कसं असेल? किती वेळ लागेल? असे प्रश्न ठाकरे गटाच्या वकिलांनी अध्यक्षांना विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ठाकरे गटाचा अध्यक्षांवर विलंब लावल्याचा आरोप ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांवर विलंबाचा आरोप करण्यात येतोय. ठाकरे गटाने याबाबत सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल केलीय. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या सुनावणी वेळी राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दोन आठवड्यांचा वेळ वाढवून दिला होता. पण आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राहुल नार्वेकर यांनी आज तातडीची सुनावणी बोलावली आहे.



