राज्यात ‘बिनविरोध’चा नवा पायंडा; महायुतीचे ६० हून अधिक उमेदवार विजयी

    24

    महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता कोर्टाच्या आदेशाने या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात नगरपरिषद निवडणुका झाल्या. आता महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारील मतमोजणी म्हणजे निकाल आहे. पण या महापालिका निवडणुकांसाठी एकही मत पडण्याआधीच भाजप-शिवसेना युतीने दमदार सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात भाजप-शिवसेनेचे उमेद्वार बिनविरोध निवडून आले आहेत. मतदान होण्याआधीच भाजप-शिवसेनेचे 66 उमेदवार नगरसेवकपदी निवडून आले आहेत.

    अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दोन ठिकाणी जिंकले आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. सर्वपक्षीयांकडून बंडखोरांना शांत करण्याचे, त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु होते. अनेक ठिकाणी ठिकाणी बंडखोरांनी बंडखोरांनी उमेदवारी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यानंतर 66 ठिकाणी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं स्पष्ट झालं. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. इथे महायुतीच्या 21 उमेदवारांनी मतदानाआधीच विजय मिळवला आहे. यात भाजपचे सर्वाधिक 15 आणि शिवसेनेचे 6 उमेदवार आहेत. केडीएमसी महापालिकेची सदस्या संख्या 122 आहे.

    अहिल्यानगर महापालिकेत भाजपचे तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन जण बिनविरोध निवडून आले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील महापालिकांमध्ये कोणत्याच प्रभागात निवडणक बिनविरोध झालेली नाही.

    भाजपचे ४४ बिनविरोध

    कल्याण-डोंबिवली १५, पनवेल ६, भिवंडी-निजामपूर ६, जळगाव ६, पुणे २, पिंपरी-चिंचवड २, धुळे ४, अहिल्यानगर ३ शिंदे गटाचे १९ जण बिनविरोध

    ठाणे ७, कल्याण-डोंबिवली व जळगावमध्ये प्रत्येकी सहा असे १९ उमेदवार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here