राज्यात काल दिवसभरात 6 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद, 231 मृत्यू
नवी दिल्ली : राज्यात गेल्या 24 तासांत 6 हजार 600 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 7 हजार 431 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय 231 मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत 60 लाख 83 हजार 319 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.61 टक्के इतकं झालं आहे. दिवसभरात राज्यात 6 हजार 600 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे.
राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के
राज्यात दिवसभरात 231 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.1 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 77 लाख 60 हजार 862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 96 हजार 756 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 4 लाख 79 हजार 553 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 3 हजार 289 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज रोजी एकूण 77,494 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्ण
मुंबई – 5402
ठाणे- 5990
पुणे- 16001
सातारा-7936
सांगली-7656
सोलापूर- 4471
अहमदनगर-5445
नाशिक-946
औरंगाबाद- 587
नागपूर- 1758
11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध परिस्थिती चिंताजनक
महाराष्ट्रातल्या 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. तसंच 11 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये लेव्हल थ्रीचे निर्बंध कायम राहणार आहेत असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.