राज्यात ओमीक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सध्या देशात ४१५ ओमीक्रॉन रुग्ण त्यातील बहुतांश रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

433

दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राने खूप काही गमावले आहे.त्यामुळे आता आगामी धोके ओळखून शासन पुन्हा एकदा सावध पावले उचलायला लागले आहे. आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा रात्रीची संचारबंदी केली आहे.परन्तु आता कडक लॉकडाऊन लागणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे. याच मुद्द्यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता सध्यातरी त्यांनी फेटाळून लावली. परंतु सोबतच त्यांनी लॉकडाऊन केव्हा लावेल जाऊ शकेल याची देखील माहिती दिली आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेताना यापुढे ऑक्सिजनच्या उपलब्धतेच्या अनुषंगानेच घेतला जाईल. ज्यादिवशी राज्याला ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्यादिवशी आपल्याला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असं राजेश टोपे म्हणाले. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची 800 मॅट्रीक टनाची आवश्यकता 500 मॅट्रीक टनावर आणावी लागेल. तशी परिस्थिती दिसत आहे, असं त्यांनी सांगितलं.मात्र, ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते.आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा हेतू नये. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत.आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावं, असंही त्यांनी सांगितलं. जेव्हा ओमीक्रॉन बाधितांची संख्या हजारावर पोहोचेल, तेव्हा परिस्थिती खूपच अवघड होईल. कारण ओमीक्रॉनच्या प्रसाराचा वेग प्रचंड आहे.3 परदेशात एका दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. क्षेत्रफळाच्यादृष्टीने महाराष्ट्राच्या निम्मा असलेल्या फ्रान्समध्ये दिवसाला ओमीक्रॉनचे एक-एक लाख रुग्ण सापडत आहेत.आपल्याकडेही आता ओमीक्रॉनचे बऱ्यापैकी रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ती ओमीक्रॉन व्हेरिएंटचीच असेल, असेही टोपे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here