राज्यातील सर्वंच शाळा सुरू करण्याचा विचार

613

राज्यातील सर्वंच शाळा सुरू करण्याचा विचार

मुंबई : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा सुरू आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे काहीही साध्य होत नाही. विद्यार्थी शिक्षणात मागे पडले आहेत. विद्यार्थी एकलकोंडी झाले आहेत. त्यामुळे आता सर्वंच शाळा सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहेत.

पुढच्या आठवड्यात बैठक
याबाबतचा निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. कोरोना संख्या कमी असलेल्या भागात सध्या 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे.

रुग्णसंख्या घटल्याने विचार
ऑगस्टमध्ये ब्रेक द चेन अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आले आहेत. मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत. पण आता लवकरच शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. याअंतर्गत हॉटेल्स सुरू करण्यात आली आहेत, दुकानांची वेळ वाढवण्यात आली आहे. आता याचा पुढचा टप्पा म्हणजे राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत विचार सुरू आहे.

शिक्षण विभागावर जबाबदारी
टास्क फोर्सबरोबर झालेल्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय शिक्षण विभागावर सोपवण्यात आला होता. यानंतर आता शिक्षण विभागाकडून चाचपणी सुरू करण्यात आलेली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यासंदर्भात अधिकाऱ्यांशी बैठक घेणार असून या बैठकीनंतर राज्यातील शाळा कधी सुरू होणार हे स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here