राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिपाई पद रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
या निर्णयामुळे राज्यात भविष्यातील शिपायांच्या सुमारे 52 हजार नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे.
सध्या कार्यरत असलेले चतुर्थ श्रेणी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही पदे रद्द होतील.
या निर्णयाचा मराठवाड्याचे शिक्षक आमदार आणि काँग्रेस नेते विक्रम काळे यांनी निषेध केला आहे.
यापुढे काय असणार शाळेमध्ये शिपाई या पदासाठी सरकारची योजना?
▪️नवीन भरतीऐवजी शाळांना ठोक स्वरुपात शिपाई भत्ता दिला जाणार आहे.
▪️यात शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाईगार, कामाठी, तेलवाला, हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर यांचा समावेश आहे.
▪️यापुढच्या काळामध्ये रिक्त पदे न भरता गरज असलेल्या ठिकाणी तात्पुरत्या मानधन तत्वावर शिपाई दिला जाणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖





