राज्यातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात आजपासूनच नवे करोना निर्बंध लागू

राज्यातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात आजपासूनच नवे करोना निर्बंध लागू होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या तीन दिवसांत आरोग्य खाते, टास्क फोर्स आणि विविध यंत्रणांशी सविस्तर चर्चा केली आहे. या सगळ्यांकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे मुख्यमंत्री राज्यात नवे करोना निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. राज्यातील रुग्णवाढीचा वेग प्रचंड असल्याने तातडीने निर्बंध लागू करण्याची गरज आहे.

त्यामुळे विकेंड सुरु होण्यापूर्वी म्हणजे आजपासूनच राज्य सरकार महाराष्ट्रात नवे करोना निर्बंध लागू करणार का, हे पाहावे लागेल.तसे झाल्यास राज्यात आजपासून विकेंड लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यू अथवा दोन्ही पर्याय लागू होऊ शकतात. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. उर्वरित अनावश्यक सेवा आणि कामकाजावर निर्बंध घातले जातील.

तर दुकानांच्या वेळा सकाळी १० ते रात्री १० पर्यंत मर्यादित असेल. तर शनिवारी आणि रविवारी दुकाने पूर्णपणे बंद राहू शकतात. याशिवाय, उद्याने, चौपाट्या आणि धार्मिक स्थळे पुन्हा एका बंद केली जाऊ शकतात. लग्न, कार्यालये आणि हॉटेल्समध्ये यापूर्वीच ५० टक्क्यांची अट घालण्यात आली आहे. हे निर्बंध आणखी कठोर केले जाऊ शकतात.

टास्क फोर्सकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात निर्बंध लागू करायचे नाही, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले. राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

करोना विषाणूचे संक्रमण थांबायला पाहिजे. त्यासाठी सर्वप्रकारच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातत्याने व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांशी चर्चा करत असतात. टास्क फोर्स, आरोग्य सचिव आणि मीदेखील मुख्यमंत्र्यांना करोना परिस्थितीची माहिती दिली आहे. या सर्व माहितीवर सारासार विचार करुन मुख्यमंत्री निर्बंधांबाबत निर्णय घेतील, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात दिवसाला तब्बल ४१ हजार नवे रुग्णमहाराष्ट्रात शुक्रवारी दिवसभरात करोनाच्या ४०,९२५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, आज राज्यात एकूण २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २०९७१ रुग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. मुंबईतील करोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या ८ लाख ७२ हजार ७३० इतकी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here