राज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री
राजनाथ सिंह यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. अतिवृष्टीग्रस्त भागात बचाव व मदतकार्यासाठी सैन्यदलांच्या मदतीचे संरक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री सातत्याने आपत्कालीन स्थितीचा आढावा घेत आहेत
संरक्षण मंत्रालयाशी समन्वयासाठी नोडल ऑफिसर म्हणून मदत व पुनर्वसन सचिव असिम गुप्ता यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधींना सूचना दिल्या आहेत- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती