राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते पोलिस बांधवांसाठी प्रतिक्षा कक्ष व सुसज्ज शौचालय बांधकामाचा शुभारंभ
सिल्लोड येथे पोलीस स्टेशन आवारात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या स्थानिक निधीतून पोलीस बांधवांसाठी प्रतीक्षा कक्ष तसेच सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सुसज्ज शौचालय बांधकामाचे भूमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड येथे पोलिसांसाठी सर्व सुविधेने परिपूर्ण सुसज्ज असे पोलीस प्रतिक्षालय आणि शौचालय उभारल्या जात आहे. सिल्लोड चा उपक्रम म्हणजे सुरक्षिततेतून स्वच्छतेकडे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले. विशेष पोलीस महानिरीक्षक केएमएम प्रसंन्ना यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला होती.