राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त
लोणी हेलीपॅडवर आगमन
शिर्डी, दि.27 :- महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम श्री. भगत सिंह कोश्यारी यांचे अहमदनगर जिल्हयातील विविध कार्यक्रमांसाठी दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज लोणी येथील हेलीपॅडवर आगमन झाले. राज्यपाल महोदयांच्या आगमनप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी , प्रवरा इन्स्स्टियुट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ.व्ही.एन.मगरे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस दलातर्फे राज्यपाल महोदयांना मानवंदना देण्यात आली. आगमनानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मोटारीने लोणी येथील प्रवरा रुरल आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पीटलच्या भूमिपूजन समारंभासाठी मार्गस्थ झाले.
000
Home English News Lawyer राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त लोणी हेलीपॅडवर आगमन